80च्या दशकातील या अभिनेत्रीने आपल्यापेक्षा 30 वर्ष लहान मुलासोबत लग्न करून नंतर त्याच्यावरच केला आरोप.. आता जगतेय एकाकी आयुष्य..

80च्या दशकातील या अभिनेत्रीने आपल्यापेक्षा 30 वर्ष लहान मुलासोबत लग्न करून नंतर त्याच्यावरच केला आरोप.. आता जगतेय एकाकी आयुष्य..

1980च्या दशकातील सर्वात ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री झीनत अमानने बॉलिवूड अभिनेत्रींना खऱ्या अर्थाने बिनधास्त आणि बोल्ड बनवले. झीनत अमान बॉलीवूड मध्ये चमकण्याआधी बॉलीवूड हिरोईन्सची प्रतिमा अगदीच सुशील भारतीय नारीची होती. परंतु झीनत च्या पदार्पणानंतर हे चित्र पूर्णपणे बदलले.

हरे राम हरे कृष्णा, सत्यम शिवम सुंदरम, लावरीस, डॉन, कुर्बानी, द ग्रेट गॅम्बलर, दोस्ताना, यादों की बरात, महान आणि पुकार यांच्यासह अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये झीनत अमान झळकली. आपल्या अदाकारीने तिने अनेक चाहत्यांचे हृदय जिंकले. 80 च्या दशकात तर ती आपल्या करिअरच्या अगदीच टोकावर होती. एकेकाळी तरुणांच्या हृदयावर राज्य केलेली झीनत आता मात्र 69 वर्षांची झाली आहे.

तिच्या बोल्ड स्टाईलसोबतच झीनत अमान नेहमीच तिच्या लव्ह लाइफसाठी चर्चेत राहिली. झीनत कडे ना सौंदर्याची कमी होती ना तिच्या चाहत्यांची. बर्‍याच लोकांनी झीनत वर अक्षरशः जीव ओवाळून टाकला होता. त्या काळात जितकी चर्चा झीनतच्या अदाकारीची व्हायची तितकीच किंबहुना त्याहून जास्त तिच्या खाजगी आयुष्याची होत असे.

झीनत च्या संपूर्ण कारकिर्दीत तिचे नाव अनेक कलाकारांसोबत जोडले गेले. यातील काहीं सोबत झीनतचे बराच काळ संबंध राहिले आहेत. तर अनेकदा हे संबंध फार काळ टिकू शकले नाहीत. तिचे नाव देवानंद, संजय खान, पाकिस्तानी क्रिकेटर इम्रान खान यांच्यासह अनेक लोकांशी संबंधित होते, विशेषत: इम्रान खानसोबत असलेले झीनत चे प्रेमसंबंध खूप लोकप्रिय होते.

झीनत अमानवर प्रेम करणारे तर भरपूर होते पण प्रेम निभावणार मात्र कोणी तिला मिळू शकला नाही. हेच कारण आहे की तिचे वैयक्तिक जीवन नेहमीच कॉन्ट्रोव्हर्सी राहिली आणि ती तिच्या रिलेशनशिप्स साठी गॉसिप जगतात नेहमीच ठळक बातम्यात राहिली आहे. .

बहुधा फारच कमी लोकांना माहिती असेल की झीनतने एकदा दोनदा नव्हे तर तब्बल तीन विवाह केले होते. आणि असे असूनही ती बर्‍याच लोकांच्या प्रेमातही होती. परंतु असे असूनही वयाच्या 69 व्या वर्षी ती अजूनही अविवाहित आणि एकटे आयुष्य जगत आहे. आणि याचे कारण आहे तिला आजवर न मिळू शकलेलं प्रेम. झीनतच्या म्हणण्यानुसार ती आजही खऱ्या प्रेमाच्या शोधात आहे.

झीनत बर्‍याचदा प्रेमात पडली होती आणि त्याच्या प्रेमाच्या बर्याच कथा आहेत, पण इम्रान खानवर तिचे सर्वात जास्त प्रेम होते. त्या काळात इम्रान खान हा पाक क्रिकेट संघाचा कप्तान होता. इम्रान खान देखील झीनतच्या अदाकारीचा दिवाना होता आणि झीनत तेव्हा त्याच्या चमकदार खेळाकडे आकर्षित व्हायची.

हे दोघेही लंडनमध्ये बर्‍यापैकी भेटत असत. असं म्हणतात की झीनतला भेटण्यासाठी इम्रान भारतात बराच प्रवास करायचा. दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते. परंतु नियतीला मात्र हे मान्य नव्हते. इतर लोकांप्रमाणे झीनत यांचेही इम्रानवरचे प्रेम कोणत्याही लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही.

दोन वर्षांपूर्वी झीनत अमान अचानक चर्चेत आली तेव्हा तिने अमन खन्ना उर्फ सरफराज या व्यावसायिकावर विनय-भंग आणि फसवणूकीचा गुन्हा दाखल केला होता. झीनतच्या तक्रारीनंतर अमन खन्ना उर्फ सरफराजला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले होते आणि प्रकरण कोर्टापर्यंत गेले. परंतु सत्य समोर आल्यावर सर्वांनाच धक्का बसला. ज्याच्यावर झीनतने गुन्हा दाखल केला आहे, त्या सरफराजसोबत झीनतने आधीच लग्न केले असल्याचे समजले.

स्वत: सरफराजने सांगितले होते की झीनतच्या प्रेमापोटी त्याने आपला धर्मसुद्धा बदलला होता आणि अमन खन्नाहून सरफराज हसन झाला होता. इतकेच नाही तर सरफराजने झीनत अमानने त्याच्याशी लग्न केल्याचा पुरावा न्यायालयात दाखविला. या दोघांचं लग्न लावलेल्या मौलवीला जेव्हा कोर्टात बोलावले गेले तेव्हा मौलवीनेही लग्नाचे सत्य उघड केले. ते म्हणाले की ते न जुळणारे लग्न कसे विसरता येईल. वधू 59 वर्षांची होती आणि वर फक्त 33 वर्षांचा. झीनत अमानचे लग्न त्याच मौलवीने सरफराज उर्फ अमनसोबत लावले होते.

अमन खन्ना आधीच विवाहित होता आणि दोन मुलांचा बाप होता. झीनत अमानने एका पार्टीत अमन खन्ना नावा च्या कन्स्ट्रक्शन व्यावसायिकाला भेटली होती. त्याच वेळी, ते मित्र बनले आणि नंतर ते प्रेमात पडले. झीनत अमानच्या फायद्यासाठी, अमन खन्नाने आपला धर्म बदलला आणि सरफराज नाव ठेवून लग्न केले, परंतु त्यांच्यात न जुळलेल्या नात्याचे नशीब चांगले ठरले नाही आणि दोघांनी घट-स्फो-ट घेतला.

admin