अनुष्का शर्मा अथवा विराट कोहली नव्हे तर ही व्यक्ती ठेवणार त्यांच्या मुलीचे नाव?

अनुष्का शर्मा अथवा विराट कोहली नव्हे तर ही व्यक्ती ठेवणार त्यांच्या मुलीचे नाव?

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या आयुष्यात काल गोंडस मुलीने प्रवेश केला असून विराटनेच ही गोड बातमी ट्विटरद्वारे दिली आहे. विराटने ट्विट करत सांगितले होते की,”तुम्हाला सांगताना आनंद होत आहे की, आज दुपारी आम्हाला मुलगी झाली. तुमच्या प्रेमासाठी, प्रार्थनेसाठी आणि शुभेच्छांसाठी मी आभार मानतो.

अनुष्का आणि आमची मुलगी दोघेही ठणठणीत आहेत आणि आमच्या आयुष्यातील नव्या प्रवासाची सुरुवात झाली आहे. आशा करतो तुम्ही आमच्या प्रायव्हेसीचा आदर कराल. तुमचा विराट”

अनुष्का आणि विराट यांना मुलगी झाल्यानंतर आता त्यांच्या मुलीचे नाव काय असणार याची उत्सुकता या दोघांच्या फॅन्सना लागली आहे. पण त्यांच्या नावाबाबत एक बातमी मीडियात आलेली आहे. डीएनएनं दिलेल्या वृत्तानुसार विराट आणि अनुष्काच्या मुलीचं नाव बाबा अनंत महाराज ठेवणार आहेत.

विराट आणि अनुष्का हे दोघेही अनंत महाराज यांना प्रचंड मानतात. त्यामुळे याआधी देखील त्यांनी अनेकवेळा त्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडींशी निगडित गोष्टींवर त्यांचा सल्ला घेतलेला आहे. विराटचा भाऊ विकास कोहलीने बाळ झाल्यानंतर काल सोशल मीडियावर कोहली कुटुंबातील या ‘लक्ष्मी’चा पहिला फोटो शेअर केला होता.

या फोटोत तिचा चेहरा दिसत नसला तरी फक्त इवलीशी पावलं तेवढी दिसली होती. पांढऱ्या शुभ्र कापडावर भाचीची इवलीशी पावलं आणि सोबत तिचे स्वागत करणारे कार्टून पात्र असा एक काही सेकंदांचा व्हिडीओवजा फोटो त्याने पोस्ट केला होता.

admin