मिस वर्ल्ड इव्हेंटच्या रात्री प्रियंका चोप्राने करून ठेवला हा उद्योग, कसेबसे झाकले सत्य..

अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिच्या “अनफिनिश्ड” या पुस्तकाबद्दल चर्चेत आहे. पुस्तकात अभिनेत्रीने चित्रपटांपासून ते तिच्या आयुष्याशी संबंधित अनेक खुलासे केले आहेत.

दरम्यान, अभिनेत्रीने मिस वर्ल्ड झाल्याच्या दिवशी तिच्याबरोबर घडलेल्या एका छोट्या घटनेविषयी सांगितले. हेअर कर्लर वापरल्याने तीने आपले कपाळ जा ळून घेतल्याचे तीने सांगितले. यानंतर तीने आपल्या केसांच्या मदतीने ज ळा लेला भाग लपवला.

ही कथा प्रियंका चोप्राने एका शोमध्ये जिमी फॅलनसह सांगितली होती. आपली देसी गर्ल म्हणते, माझ्या चेहेऱ्यावर केसांची एक बट लटकत होती. त्यावेळेस मी हे अगदी मस्त प्रकारे सादर केले होते जणू मी हे हेतुपुरस्सर केले आहे परंतु प्रत्यक्षात तसे नव्हते. प्रियांका चोप्राने सन 2000 मध्ये मिस वर्ल्डचे विजेतेपद जिंकले होते.

ती पुढे सांगते मी माझ्या केसांना कर्ल करण्याचा प्रयत्न करीत होते आणि बॅकस्टेजमध्ये जवळपास ९० मुली होत्या, प्रत्येकजण इकडे-तिकडे फिरत होत्या आणि त्यांचे केस व मेकअप करत होत्या आणि त्यांचे केस व मेकअप करुन घेत होते.

“कोणीतरी मला ढक लले तेव्हा मी माझे केस कर्लर ने कुरळे करण्याचा प्रयत्न करीत होते” अभिनेत्रीने सांगितले. कर्लर खूप गरम असतो मला कपाळाला चांगलाच च टका बसला आणि माझ्या कपाळावर भा ज ल्या च्या खुणा आल्या.

अभिनेत्री पुढे म्हणते, ‘माझ्या चेहर्‍यावर मला खूप मोठा डाग दिसत होता जो मला लपवायचा होता आणि केसांचा कर्ल अद्याप पूर्ण झालेला नव्हता. पण जेव्हा जेव्हा मी हा फोटो पाहते तेव्हा मला असे वाटते की मी केसांची बट मुद्दाम तयार केली आहे.

प्रियंकाने आपल्या अनफिनिश्ड या पुस्तकात आणखी एक किस्सा शेअर केला. तीने आपल्या प्रियकराला कपाटात लपवून ठेवलं होतं आणि तिच्या काकूने त्याला पकडलं. प्रियंकाच्या वॉर्डरोबमध्ये त्या मुलाला पाहून तिच्या काकूंना खूप राग आला आणि काकूने प्रियांकाच्या आईकडे तक्रार केली. असं म्हणतात की यानंतर थोड्याच काळामध्ये प्रियंका भारतात परतली.