विनोद मेहराची मुलगी सोनियाने केला मोठा खुलासा म्हणाली, रेखा आणि विनोद मेहरा यांच्यात…

विनोद मेहराची मुलगी सोनियाने केला मोठा खुलासा म्हणाली, रेखा आणि विनोद मेहरा यांच्यात…

बॉलिवूड अभिनेते विनोद मेहरा यांची मुलगी सोनिया मेहरा सध्या चर्चेत आहे. सोनियाने बॉलिवूडला अलविदा केल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. मात्र या सगळ्या अफवा असल्याचा खुलासा सोनियाने केला आहे. याशिवाय दिवंगत वडील विनोद मेहरा आणि अभिनेत्री रेखा यांच्या नात्यावरही ती बोलली आहे.

ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सोनिया रेखा व विनोद मेहरा यांच्या नात्यावर बोलली. रेखा व तुझ्या वडिलांनी गुपचूप लग्न केले होते, अशी चर्चा होती. ही चर्चा खरी आहे का? असा प्रश्न सोनियाला या मुलाखतीत विचारण्यात आला यावर, सोनियाने थेट काहीही बोलण्यास नकार दिला. मी यावर कमेंट करू शकत नाही.

कारण मला याबद्दल काहीही माहिती नाही. माझ्या जन्माआधीची ही चर्चा आहे. ते माझ्या वडिलांचे आयुष्य होते, मी त्यांच्या आयुष्याबद्दल आत्ता का बोलावे? मला फक्त एवढेच माहितीये की, रेखा व माझे वडील खूप जवळचे मित्र होते, असे सोनियाने म्हटले.

वडिलांचे रेखासोबत लग्न केले होते की नाही, हे कधी आई किरण मेहरा हिला विचारावे वाटले नाही का? असा प्रश्न केला असता ती म्हणाली, ‘प्रामाणिकपणे सांगते, मला कधीच असे वाटले नाही. प्रत्येकाचा एक भूतकाळ असतो आणि मला त्यावरून कोणाला जज करण्याचा मुळीच अधिकार नाही. त्यामुळे मी माझ्या आईला कधीच याबद्दल विचारले नाही. काही गरजेचे असते, तर तिनेच स्वत:हून मला सांगितले असते.’

मी रेखा यांना 3-4 वेळा भेटले आहे. त्या खूप सुंदर आणि संवेदनशील महिला आहेत, असेही सोनियाने सांगितले. विनोद मेहरा यांनी वयाच्या 45व्या वर्षी जगाचा निरोप घेतला होता. त्यांना तिस-या पत्नीपासून दोन मुले आहेत रोहन मेहरा व सोनिया मेहरा. सोनिया सध्या दुबईत योगा इंस्ट्रक्टर म्हणून काम करते.

तिची आई किरण मेहरा केन्यात राहते. सोनियाने व्हिक्टोरिया नंबर 203, शॅडो, एक मैं और एक तू, रागिनी एमएमएस या सिनेमात काम केले आहे. विनोद मेहरा यांचे निधन झाले तेव्हा सोनिया फक्त दीड वर्षांची होती. रेखा आणि विनोद मेहरा यांच्या अफेअरची एकेकाळी चांगलीच चर्चा झाली होती.

एवढेच नव्हे तर त्या दोघांनी लपून लग्न केले होते असे देखील म्हटले जात होते. रेखा यांनी या चर्चेविषयी मौन राखणेच पसंत केले. पण सिमी गरेवाल यांच्याएका कार्यक्रमात त्यांनी विनोद मेहरा यांच्यासोबत असलेल्या नात्याविषयी खुलासा केला होता. या कार्यक्रमात सिमी यांनी रेखा यांना विचारले होते की, विनोद मेहरा आणि तुझं लग्न झालं असं म्हटले जाते हे खरे आहे का त्यावर क्षणाचाही विलंब न लावता रेखा यांनी सांगितले होते की, विनोद हे माझ्यासाठी खूप खास होते.

माझ्ज्या आयुष्यात त्यांची खास जागा होती. पण मी आणि विनोद यांनी कधी लग्न केले नाही. रेखा यांचे हे उत्तर ऐकल्यानंतर सिमी यांनी पुन्हा एकदा विचारले होते. खरंच तुम्ही लग्न केल नव्हते का… त्यावर कधीच नाही असे उत्तर रेखा यांनी दिले होते. रेखा यांनी विनोद मेहरा यांच्यासोबत लग्न केले होते असा उल्लेख यासिर उस्मान यांच्या ‘ रेखा: द अन्टोल्ड स्टोरी’ या पुस्तकात केला आहे. रेखा यांनी मात्र ही गोष्ट कधीच मीडियात मान्य केली नाही.

admin