केसात सिंदूर, हातात बांगड्या,चेहऱ्यावर लग्नाची चमक… हनिमून साजरा करून विकी आणि कटरिना परतले मुंबईत…

केसात सिंदूर, हातात बांगड्या,चेहऱ्यावर लग्नाची चमक… हनिमून साजरा करून विकी आणि कटरिना परतले मुंबईत…

बॉलिवूड अभिनेत्री कटरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल आता कायमचे एकत्र आले आहेत. 9 डिसेंबरला लग्न झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दोघेही हनिमूनला गेले होते. आता हे जोडपे हनीमूनहून परतले आहे. लग्नानंतर दोघेही पहिल्यांदाच मुंबई विमानतळावर पती-पत्नीच्या रूपात दिसले. यादरम्यान कटरिना आणि विकीने पापाराझींना भेटताना खूप आनंदाने शुभेच्छा दिल्या. लग्नानंतर करिना साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती.

केसमध्ये सिंदूर, गळ्यात मंगळसूत्र, हातात चुडा, फिक्कट गुलाबी रंगाची चुडीदार असा कटरिनाचा हा विवाहित लूक पाहून कोणाचीच नजर तिच्यावरून फिरकत नव्हती. त्याच वेळी, तिचा पती अभिनेता विकी कौशलने ऑफ-व्हाइट शर्ट आणि पॅन्ट घातली होती. दोघेही एकमेकांना पूरक होते.

राजस्थानमध्ये रॉयल स्टाईलमध्ये डेस्टिनेशन वेडिंग केल्यानंतर, कटरिना आणि विकी दररोज त्यांच्या लग्नाची काही निवडक छायाचित्रे इंटरनेटवर शेअर करत आहेत. मेहंदी, हळद, सात फेरेपासून ते रॉयल पॅलेसमधील रॉयल फोटोशूटपर्यंत सर्व काही ते त्यांंच्या इन्स्टाग्रामवर चाहत्यांसाठी शेअर करत असतात. आता या नवविवाहित जोडप्याचे फोटो सर्वत्र पाहायला मिळत आहेत. दोघांचे प्रत्येक चित्र त्यांच्या आनंदाचे एक नवीन पान उघताना दिसत आहे.

या लग्नानंतर 10 डिसेंबरला कटरिना आणि विकीचे कुटुंबीय आणि पाहुणे पुन्हा मुंबईत आले आहेत. अशा परिस्थितीत विकी आणि कटरिना लग्नानंतर हनीमूनसाठी मालदीवला जाणार असल्याची बातमी आली होती. दोघेही हेलिकॉप्टरमध्ये बसलेले दिसले. मात्र, त्यांच्या हनीमून डेस्टिनेशनबाबत अद्याप काहीही खुलासा करण्यात आलेला नाही.यापूर्वी 6 डिसेंबरला कतरिना आणि विकी मुंबई विमानतळावर एकत्र दिसले होते.

दोघेही लग्नासाठी राजस्थानला रवाना होणार होते. आता आठवडाभरानंतर कतरिना आणि विकी पती-पत्नीच्या रुपात मुंबईत परतले आहेत. आत्तापर्यंत, समोरच्या छायाचित्रांमध्ये या जोडप्याला एकत्र पाहण्यासाठी चाहते विमानतळावर आतुरतेने वाट पाहत होते. यादरम्यान दोघांनीही एकत्र अनेक पोज दिल्या. लग्नानंतर या जोडप्याला बॉलिवूड स्टार्सकडून खूप महागड्या भेटवस्तूही मिळाल्या आहेत.

विकी कौशल आणि कतरिना कैफच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या महिन्यात दिवाळीच्या मुहूर्तावर अभिनेत्री कतरिना ‘सूर्यवंशी’ चित्रपटात दिसली होती. यानंतर ती ‘फोन भूत’ आणि ‘जी ले जरा’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. कतरिना कैफ – सलमान खानसोबत ‘टायगर 3’ चित्रपटात दिसणार आहे.

अभिनेता विकी कौशलच्या कामाबद्दल सांगायचे तर, त्याचा ‘सरदार उधम’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. विकी कौशल लवकरच महाभारताचा योद्धा आणि गुरु द्रोणाचार्य यांचा मुलगा अश्वत्थामा यांच्यावर आधारित ‘द अमर अश्वत्थामा’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सारा अली खान देखील दिसणार आहे.

admin