वाहतूक पोलिसांनी फाडली ह्या अभिनेत्याची पावती, अजून भरला नाहीये दंड!!!

वाहतूक पोलिसांनी फाडली ह्या अभिनेत्याची पावती, अजून भरला नाहीये दंड!!!

सेलेब्रिटी असल्याचे अनेक फायदे आहेत , तसेच सेलेब्रिटी असल्याचे तोटे हि आहेत. सेलिब्रिटी असल्याने तुम्हाला काही सुविधा मिळतात हे नाकारता येत नाही. आणि नुकत्याच झालेल्या अहवालात असे काही फायदे समोर आले आहेत.

एका वृत्तानुसार, सलमान खान, अर्जुन कपूर आणि कपिल शर्मा यासारख्या बॉलिवूड सेलिब्रिटींची वाहने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करताना आढळली, अनेकवेळा ह्या सेलिब्रिटींची पावती हि फाडण्यात आली आहे. तथापि, दंड अद्याप भरला गेला नाहीये.

कपिल शर्मा, सलमान खान आणि अर्जुन कपूर यांची वाहने ई-चालान्स बजावल्यानंतरही वाहतुकीचा दंड भरलेले नाहीत, अशी यादी देण्यात आली आहे. कॉमेडियन कपिल शर्माची कार स्वत: च्या नावावर आहे, तर सलमानचे वाहन सलमानच्या भावाच्या अरबाज खानच्या फिल्म प्रोडक्शन कंपनी (अरबाज खान प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेड) च्या नावे नोंदणीकृत आहे.

सलमान खानच्या वाहनांना ज्या भाऊ अरबाज खानच्या फिल्म प्रोडक्शन कंपनीच्या नावाखाली नोंदणीकृत आहेत अश्या वाहनांना यंदा चार वाहतुकीच्या उल्लंघनाबद्दल 4000 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. यासंदर्भात पोलिसांकडून त्यांना कोणतीही माहिती मिळाली नाही अथवा दंड त्वरित भरला गेला असता, असे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले.

सलमान प्रमाणे कपिल शर्मा पण कमी नाही, त्याच्याविरूद्ध 2000 रुपयांची पावती फाडली गेली आहे. हा विनोदी कलाकार सध्या शहराबाहेर आहे असे सांगण्यात आले आहे.

या यादीत आणखी एका कलाकाराचा समावेश आहे, जो आहे अर्जुन कपूर. अर्जुन कपूरच्या नावे 2000 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. वेगाने गाडी चालवल्या प्रकरणी वाहनाची पावती फाडण्यात आली आहे, अशी माहिती आहे.

यात वेगाने गाडी चालवणे, सिग्नल तोडणे आणि झेब्रा क्रॉसिंगवर थांबणे अशा उल्लंघनांसाठी लोकांना ई-चालान करण्यात आले होते. सेलिब्रिटी व्यतिरिक्त इतर सेलिब्रेटी व बरेच राजकारणी आणि सार्वजनिक कार्यकर्तेही त्या यादीमध्ये होते.

admin