घरातील दोष दूर करायचे असतील तर ‘हे’ उपाय करा, क्षणात दूर होतील समस्या !

घरातील दोष दूर करायचे असतील तर ‘हे’ उपाय करा, क्षणात दूर होतील समस्या !

बहुतेक वेळा असे दिसून येते की एखादी व्यक्ती कठोर परिश्रम करते परंतु त्याला त्याचे योग्य फळ मिळत नाही. यशा ऐवजी त्याच्या हातात अपयश येते. अचानक, त्याच्या आनंद आणि समृद्धीमध्ये अडथळे आणि समस्या येतात.

वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात वास्तू दोष हे लक्षण दिसून आल्यास.अशा परिस्थितीत वास्तुमध्ये काही उपाय दिले गेले आहेत. ज्यामुळे या समस्या सोडवून तुम्ही या अपयशावर मात करू शकता.

स्वस्तिक हे वास्तुमध्ये एक अतिशय शुभ आणि सकारात्मक ऊर्जा चिन्ह मानले जाते.मुख्य दरवाजाच्या वर हनुमानाच्या पायावर लावलेले कुंकू घ्या आणि रुंद आणि लांब स्वस्तिक चिन्ह बनवा आणि जेथे वास्तु दोष असेल तेथील वास्तू दोष दूर होईल व सुख शांती लाभेल.

घराच्या मुख्य गेटमधून सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा प्रवेश करतात.अशा स्थितीत हा दोष दूर करण्यासाठी लाल कपड्यात मीठ बांधून दरवाजावर लटकवा. मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा.

वास्तुमध्ये असे सांगितले गेले आहे की घोड्याचा नाल लावल्यास घराची नकारात्मक उर्जा पळते. जर आपल्या घराचा मुख्य दरवाजा उत्तर किंवा पश्चिम दिशेने असेल तर घराच्या प्रवेशद्वारावर घोड्याची लोखंडी नाल लावावी.पण नाल स्वतःहुन पडलेली असावीे.

सर्व प्रकारच्या जंतू व नकारात्मक शक्ती काढून टाकण्याची आश्चर्यकारक क्षमता तुळशीमध्ये आहे. घराचे सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर करण्यासाठी एका बाजूला केळीचे झाड आणि दुसर्‍या बाजूला भांड्यात तुळशीची लागवड करावी.घराच्या ब्रह्मास्थानात तुळशीची वनस्पती ठेवल्यास सर्व वास्तुदोष दूर होतात.

जर घरातील एखादा सदस्य रात्री वास्तुदोषामूळे झोपायला येत नसेल किंवा स्वभाव चिडचिडा झाला असेल तर त्याला दक्षिणेकडे डोकं करून झोपायला सांगावे यामुळे त्याच्या स्वभावात खुप फरक पडेल व त्याला झोप देखील चांगली लागेल.

घरात सकारात्मक उर्जा ठेवायची असेल तर, मुख्य दाराच्या दोन्ही बाजूंनी हळदीने शुभ लाभ लिहिल्यास फायदा होईल.किंवा हळद पाण्यात मिसळावा आणि सुपारीच्या पानांच्या सहाय्याने सर्व घरात शिंपडा म्हणजे लक्ष्मीचा वास आणि शांती घरात राहण्यास मदत होते.

सकाळी आणि संध्याकाळी नियमितपणे आपल्या घरातील देवघरात तूपाचा दिवा पेटवा आणि सकाळी आणि संध्याकाळी दिवसातून दोनदा शंख फुकल्यास त्या आवाजमुळे घरातून नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते.

admin