‘कबीर सिंग’मधील मोलकरीण प्रत्यक्षात दिसते इतकी सुंदर, पाहा फोटो

‘कबीर सिंग’मधील मोलकरीण प्रत्यक्षात दिसते इतकी सुंदर, पाहा फोटो

शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी स्टारर ‘कबीर सिंग’ हा सिनेमा रिलीज होऊन बराच काळ झाला. रिलीजनंतर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. पण याच चित्रपटामुळे शाहिद कपूरला कधी नव्हे इतके टीकेचा धनी व्हावे लागले होते.

होय, महिलेवर हात उचलणारा, चाकूचा धाक दाखवून कपडे उतरवणारा, दारूच्या नशेत तर्र असणारा या चित्रपटात शाहिदने साकारलेला सनकी हिरो अनेकांना भावला नव्हता. यावरून त्याच्यावर बरीच टीका झाली होती. या चित्रपटातील चित्रपटामध्ये एक सीन आहे, या सीनवरही अनेकांनी आक्षेप घेतला होता. या सीनची कधी नव्हे इतकी चर्चा झाली होती.

शाहिदच्या मोलकरणीच्या हातामधून ग्लास खाली पडून फुटतो आणि सनकी शाहिद तिच्यामागे रागाने धावत सुटतो,असा हा सीन होता. या सीनमधील ती मोलकरीण कोण होती, हा प्रश्न आजही तुम्हाला सतावत असेल तर आज आम्ही तिच्याबद्दल सांगणार आहोत.

‘कबीर सिंग’ शाहिदच्या मोलकरणीची ही भूमिका वनिता खरात नावाच्या अभिनेत्रीने साकारली होती. आधी या सीनमधील ती मोलकरीण अर्पिता खान (सलमान खानची बहिण) आहे, असा अनेकांचा समज झाला होता. पण ती अर्पिता नसून वनिता खरात आहे. रिअल लाईफमध्ये ती कमालीची सुंदर आहे.

या सीनवर सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल झाले होते. वनिताने हे मीम्स प्रचंड एन्जॉय केलेत. वनिताला ‘कबीर सिंग’ मधील ही भूमिका कशी मिळाली, हेही इंटरेस्टिंग आहे.

वनिताची एक मैत्रिण मुकेश छाब्रांच्या ऑफिसात काम करत होती. मुकेश छाब्रांना यासाठी एक नवा चेहरा होता. मैत्रिणीने वनिताची नाव सुचवले आणि तिला ऑडिशनसाठी बोलवले गेले. ऑडिशनमध्ये वनिता पास झाली आणि तिला ही भूमिका मिळाली.

वनिताने थिएटरमध्ये काम केलेय. पहिल्यांदा वनिता सेटवर गेली तेव्हा वनिता प्रचंड दडपणात होती. पण सेटवरचे वातावरण, शाहिद कपूरचा स्वभाव बघून तिचे हे दडपण कुठल्या कुठे पळाले

admin