राज्यपाल कोश्यारी यांच्यातर्फे ‘या’ हॉट अभिनेत्रीला मिळालाय राष्ट्रीय पुरस्कार.. नाव वाचून बसेल आश्चर्याचा धक्का..

राज्यपाल कोश्यारी यांच्यातर्फे ‘या’ हॉट अभिनेत्रीला मिळालाय राष्ट्रीय पुरस्कार.. नाव वाचून बसेल आश्चर्याचा धक्का..

बॉलिवूड या नावाने ओळखली जाणारी आपली भारतीय हिंदी चित्रपट हिला चित्रपट जगतात मानाचे स्थान आहे. बॉलिवूडने चित्रपट जगतात आपले स्थान टिकवण्याचे एकमेव कारण म्हणजे बॉलिवूड वर असणारी भारतीय संस्कृतीची असणारी छाप. त्यामुळेच आधी बॉलिवूड मध्ये बनणारे सगळेच चित्रपट अगदीच सामान्य चित्रपट असत व त्यात अश्ली-लता खुलेआम दाखवली जात नसे.

परंतु गेल्या काही वर्षापासून बॉलिवूड मध्ये हॉट चित्रपट बनवण्याचा ट्रेंड काहीसा वाढला आहे. याची सुरुवात मोठ्या प्रमाणात कोणी केली असेल तर दिग्दर्शक महेश भट्ट यांनी. भट्ट यांच्या चित्रपटात अतिशय बोल्ड आणि किसिंग सीन असतात. त्यामुळे या चित्रपटाला खूप मोठ्या प्रमाणात आंबटशौकीन चाहते देखील मिळाले.

आधीच्या काळात चित्रपट करताना अभिनेत्र्या सहसा असे हॉट सिन करायला तयार हिट नसत. खूप क्वचित असा एखादा सिन दिसत असे परंतु आता मात्र अशा अनेक अभिनेत्र्या बॉलिवूड मध्ये आहेत ज्या फक्त आणि फक्त अशा सीन्स साठी प्रसिद्ध आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे उर्वशी रौतेला.

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाचे आज कोट्यावधी चाहते आहेत. उर्वशीही तिच्या चाहत्यांना निराश न करता त्यांच्यासाठी दररोज तिचे नवनवीन फोटोज आणि व्हिडीओज सामायिक करत असते. उर्वशी जेव्हा काही नवीन करते, तेव्हा ती अनेकदा पोस्टद्वारे तिच्या चाहत्यांना सांगते.

हा क्रम पुढे घेत अभिनेत्रीने अशी एक बातमी शेअर केली आहे, हे समजल्यानंतर तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वत: चा एक फोटो शेअर करताना उर्वशीने सांगितले आहे की तिला स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

उर्वशी रौतेलाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ही पोस्ट शेअर करुन चाहत्यांना ही चांगली खबर दिली. हा पुरस्कार उर्वशीला महाराष्ट्र आणि गोवा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिला होता, त्याचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये उर्वशी हा पुरस्कार घेताना दिसत आहे.

ही चित्रे सामायिक करताना उर्वशीने लिहिले आहे की, “महाराष्ट्र आणि गोवा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते” राष्ट्र शक्ती राष्ट्रीय पुरस्कार 2021, राजभवन येथे प्रदान करण्यात आला “. यासह अभिनेत्रीने तिच्या कॅप्शनमध्ये # स्त्रीशक्ती # नॅशनलअवर्ड हॅशटॅग वापरला आहे. उर्वशीच्या या पोस्टवर लोकांनी तिचे अभिनंदन केले आहे.

admin