खऱ्या प्रेमाच्या शोधात शेवटी अविवाहितच राहिले हे बॉलिवूड कलाकार, पन्नाशी ओलांडूनही….

खऱ्या प्रेमाच्या शोधात शेवटी अविवाहितच राहिले हे बॉलिवूड कलाकार, पन्नाशी ओलांडूनही….

बॉलिवूड इंडस्ट्रीशी संबंधित स्टार्स नेहमीच चर्चेत असतात. तसेच चाहते त्यांच्या आवडत्या स्टारबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत राहतात. अशा परिस्थितीत जेव्हा त्यांच्या नात्याची किंवा लग्नाची बातमी बाहेर येते, तेव्हा लोकांना ती खूप आनंदाने वाचायला आवडते. पण इंडस्ट्रीमध्ये असे काही सेलेब्स आहेत ज्यांना आयुष्यात एकटे राहणे खूप आवडते.

अक्षय खन्ना
अक्षय खन्नाने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करतो. पण 46 वर्षीय अभिनेत्याचे अद्याप लग्न झालेले नाही. याचे कारण स्पष्ट करताना त्याने एका मुलाखतीत म्हटले होते की, त्याला जबाबदाऱ्यांची भीती वाटते.

उदय चोप्रा
उदय चोप्राचे नाव आतापर्यंत अनेक बॉलिवूड अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. अभिनेत्याने एका वेळी शमिता शेट्टी आणि नर्गिस फाखरीला डेट केले होते. पण त्याचे कोणतेही नाते विवाहाच्या बंधनापर्यत पोहोचू शकले नाही. कारण उदय चोप्राचा असेे म्हनने आहे की तो एकटाच आनंदी आहे.

सलमान खान
सलमान खान बॉलिवूडचा सर्वात पात्र बॅचलर आहे. त्याचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे, परंतु आजपर्यंत तो बॅचलर आहे. मात्र, 55 वर्षीय सलमान खानविषयी अनेकदा प्रश्न पडतो, की तो लग्न कधी करणार? पण अभिनेता हा प्रश्न टाळतो.

एकता कपूर
एकता कपूर टीव्ही इंडस्ट्रीची राणी आहे. तीने आपल्या कामात खूप नाव कमावले आहे. पण ती लग्नाच्या प्रकरणापासून दूर राहते. एकता सिंगल मदर आहे. तिने सरोगेसीच्या मदतीने मुलगा रवीचे तिच्या आयुष्यात स्वागत केले होते.

तुषार कपूर
एकता कपूरप्रमाणेच तिचा भाऊ आणि अभिनेता तुषार कपूरसुद्धा लग्नापासून दूर राहतो. तुषार कपूर 44 वर्षांचा आहे, पण आतापर्यंत त्याने लग्न केलेले नाही. मात्र, सरोगेसीच्या मदतीने तो वडील झाला आहे. तुषारच्या मुलाचे नाव लक्ष्य आहे, ज्याचा जन्म 2016 मध्ये सरोगेसीद्वारे झाला होता.

करण जोहर
करण जोहरलाही लग्नात रस नाहीये. त्याला आपला सर्व वेळ त्याच्या कामासाठी आणि त्याच्या दोन्ही मुलांसाठी समर्पित करणे आवडते. करण सरोगेसीच्या मदतीने यश आणि रुही या दोन मुलांचा पिताही बनला आहे, ज्यांच्यासोबत तो बराचसा वेळ घालवतो.

admin