‘तारक मेहता’ मधील अजून एक अभिनेत्री गर्भवती असल्यामुळे सोडणार मालिका? अभिनेत्रीने केलाय मोठा खुलासा…

‘तारक मेहता’ मधील अजून एक अभिनेत्री गर्भवती असल्यामुळे सोडणार मालिका? अभिनेत्रीने केलाय मोठा खुलासा…

छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतील सर्व पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. गेल्या 13 वर्षांपासून ही मालिका सातत्याने प्रेक्षकांचं मनोरजंन करत आहे. दरम्यानच्या काळात मालिकेतील अनेक कलाकार बदलले. त्यांच्या जागी नवे चेहरे आलेत. आता या मालिकेतील आणखी एक अभिनेत्री मालिका सोडणार असल्याची चर्चा आहे.

होय, तुमची आमची आवडली रोशन भाभी अर्थात ही भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बंसीवाल गरोदर असल्यामुळे मालिका सोडणार असल्याची चर्चा आहे. आता या चर्चेवर स्वत: जेनिफरनं स्पष्टीकरण दिलं आहे. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये जेनिफर ही रोशन सिंग सोधीच्या पत्नीची भूमिका साकारते. मालिकेत तिचं देखील नाव रोशन असंच आहे. या व्यक्तिरेखेमुळं ती तुफान लोकप्रिय झाली.

अनेक प्रेक्षक तिला तिच्या ख-या नावाऐवजी रोशन सोधी याच नावानं ओळखतात. मात्र इतकी प्रचंड लोकप्रियता मिळालेली असताना देखील ती या मालिकेला का सोडणार आहे? जेनिफरनं स्वत:च या चर्चेवर स्पष्टीकरण दिलं. मी गरोदर वगैरे काहीही नाही. त्यामुळं मी मालिका सोडणार ही चर्चा खोटी आहे. ही निव्वळ अफवा आहे, असं ती म्हणाली.

मी सध्या मालिकेतून ब्रेक घेतला आहे. गेले काही दिवस माझे पाय प्रचंड दुखत आहेत. त्यामुळं उपचार करण्यासाठी मी थोडा ब्रेक घेतला आहे. मी गरोदर वगैरे नाही. लवकरच नव्या कथानकासह मी तारक मेहतामध्ये पुनरागमन करेन, असंही तिनं स्पष्ट केलं.याआधी दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी हिने गरोदरपणामुळे मालिका सोडली होती.

सप्टेंबर, २०१७ पासून मालिकेत दिसली नाही. ती मॅटर्निटी लिव्हवर गेली होती. त्यानंतर तिने नोव्हेंबरमध्ये मुलीला जन्म दिला. ती मालिका सोडून अनेक वर्ष झाली आहेत आणि अद्याप ती परतली नाही. दरम्यानच्या काळात अंजली भाभीची भुमिका साकारणा-या नेहा मेहताने शो सोडला होता.

admin