फोनवर बोलणाऱ्या या चिमुकल्याला ओळखलं का? ‘तारक मेहता.. ‘मध्ये साकारतोय महत्वाची भूमिका…

फोनवर बोलणाऱ्या या चिमुकल्याला ओळखलं का? ‘तारक मेहता.. ‘मध्ये साकारतोय महत्वाची भूमिका…

तारक मेहता का उल्टा चश्मा या टीव्ही मालिकेने गेली 13 वर्ष भारतीय प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ही मालिका सामान्य माणसाच्या दैनंदिन आयुष्यातील घटनांशी संबंधित कथानकं सादर करते त्यामुळे ती सर्वच वयोगटांतील प्रेक्षकांना आवडते.

विशेष म्हणजे ही मालिका पाहून दोन घटका निखळ आनंद मिळाल्याचं अनेक जणं सांगतात. साधा विनोद आणि सर्व कलाकारांचा उत्तम अभिनय ही या मालिकेची आणखी एक जमेची बाजू. या मालिकेतील सर्व व्यक्तिरेखा जणू भारतीयांच्या घरातील एक अविभाज्य भागच झाल्या आहेत.

जेठालाल गडा, टप्पू, भिडे असो वा बाघा सगळेच कलाकार आपली भूमिका उत्तम वठवतात. या सर्व कलाकारांना आपआपला असा चाहता वर्ग आहे आणि सध्या सोशल मीडियावर त्यांचं फार मोठं फॅन फॉलोइंगही आहे.

हे कलाकार आपले फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध करतात आणि त्यांचे चाहते त्यांना दाद देतात. काही जण थ्रोबॅक फोटो म्हणजे आधीच्या आयुष्यातील फोटो टाकतात आणि मग एकच चर्चा सुरू होते. आम्ही हे सगळं सांगण्याचं कारणच एका कलाकाराने त्याचा लहानपणीचा फोनवर बोलतानाचा गोंडस फोटो टाकला आहे.

या ब्लॅक अँड व्हाइट फोटोमध्ये एक निरागस आणि गोंडस मुलगा जुन्या पद्धतीच्या टेलिफोनवर बोलताना दिसतो आहे. त्याचे डोळे मोठे आहेत. त्याने हातात रिसिव्हर पकडला आहे. जरा ओळखा बरं हा फोटो कुणाचा आहे? तुम्ही मालिका पाहत असाल तर तुम्ही रोज त्याला पाहता त्यामुळे तुम्हाला ओळखता यायला हवं.

नाही लक्षात येत तुमच्या? ठीक आहे आम्हीच तुम्हाला सांगतो. हा आहे तुमचा आमचा सर्वांचा लाडका तारक मेहता का उल्टा चश्मामधला विनोदवीर बाघा. हो बाघाची भूमिका करणाऱ्या तन्मय वेकारियानी त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्याच्या लहानपणीचा एक फोटो शेअर केला आणि तो प्रचंज व्हायरल झाला.

दोन्ही हात काटकोनांत ठेवून विशिष्ट पद्धतीने चालणारा बाघा अजब विनोद करून आपल्याला नेहमी हसवत असतो त्याचाच हा फोटो आहे. जेठालालच्या दुकानात नोकर असणारे नट्टूकाका आणि बाघा यांची जोडी तुफान फेमस आहे पण आता ही जोडी तुटली आहे. नट्टूकाकांची भूमिका करणाऱ्या घनश्याम नायक यांचं नुकतंच निधन झालं.

सध्या तरी मालिकेत फक्त बाघाच दिसतो आहे. पण नट्टूकाका आणि बाघा या विनोदवीर जोडीची प्रेक्षकांना प्रचंड सवय झाली आहे. त्यांची कमी जाणवतेच आहे. बाघा मात्र त्याच्या परीने प्रेक्षकांना हसवण्याचा घेतलेला वसा चालवत आहे.

admin