‘हेट स्टोरी’ मधील अभिनयाने वेड लावणाऱ्या अभिनेत्रीचा लेटेस्ट लूक पाहिलात का, पहिल्यापेक्षा आता जास्तच बोल्ड

‘हेट स्टोरी’ मधील अभिनयाने वेड लावणाऱ्या अभिनेत्रीचा लेटेस्ट लूक पाहिलात का, पहिल्यापेक्षा आता जास्तच बोल्ड

प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री पाओली डॅमने बॉलिवूड चित्रपट हेट स्टोरीमध्ये तिच्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावलं होतं. पाओली डॅमने बॉलिवूडच्या जरी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं नसलं तरीही तिचं सौंदर्य आणि अभिनय चाहत्यांना खूप आवडतो.

चित्रपटांव्यतिरिक्त, पाओली आता ओटीटीवर देखील दिसत आहे आणि अलीकडेच ती द ग्रेट इंडियन मर्डर या वेब सीरिजमध्ये शबनम सक्सेनाच्या भूमिकेत दिसली होती. यामध्ये ती मुख्य भूमिकेत होती आणि तिला या सिरीजमध्ये खूप पसंतीही मिळाली होती.

पाओली भलेही चित्रपटांमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते आणि तिचे नवं-नवीन फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. 2020 मध्ये नेटफ्लिक्सवरील सिरीज ‘बुलबुल’मध्येही पाओली एका दमदार भूमिकेत दिसली होती. अविनाश दास दिग्दर्शित ‘रात बाकी है’ या रहस्यमय-थ्रिलर चित्रपटातही ती एका दमदार भूमिकेत दिसली होती.

2012 मध्ये विवेक अग्निहोत्रीच्या ‘हेट स्टोरी’ या चित्रपटातून पाओलीने हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण केलं होतं. यानंतर पाओली मोजक्याच हिंदी चित्रपटांमध्ये दिसली. हेट स्टोरीनंतर ती ‘अंकुर अरोरा मर्डर केस’ आणि ‘या रा सिलिसिली’मध्ये दिसली. त्यानंतर ती हिंदी चित्रपटांमध्ये दिसली नाही. मात्र आता ती हिंदी वेब सीरिजमध्ये दिसणार आहे.

पाओली म्हणते की, तिला चित्रपटांतील ऑफर केलले भूमिका फारश्या आवडल्या नाहीत, म्हणून मी ते प्रोजेक्ट घेतले नाही. त्याऐवजी मला चांगल्या भूमिका ओटीटीवर मिळाल्या आणि त्या मी स्विकारल्या या पुढेही मला ओटीटीवर काम करायला आवडेल.

admin