बाहुबलीची अभिनेत्री तमन्नाचे ‘हे’ सर्वात मोठे रहस्य झाले उघड.. बॉलिवूडमध्ये तिच्यासोबत झाला होता असा कांड..

बाहुबलीची अभिनेत्री तमन्नाचे ‘हे’ सर्वात मोठे रहस्य झाले उघड.. बॉलिवूडमध्ये तिच्यासोबत झाला होता असा कांड..

हिंदीसह दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने रसिकांना वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे तमन्ना भाटिया. जगातील कानाकोप-यात आज तमन्नाचे चाहते आहेत. तिच्याबरोबर लग्न करण्याची अनेकजण इच्छा बाळगुन आहेत. आणि तमन्नाने देखील अजूनही अविवाहित राहून अनेकांना आशेवर ठेवलं आहे.

चित्रपटसृष्टी आणि बॉलीवुडच्या इतिहासात मैलाचा दगड ठरलेला सिनेमा म्हणजे बाहुबली. एस. एस. राजमौली यांच्या या सिनेमात तमन्नाने अभिनेता प्रभासच्या प्रेयसीची म्हणजेच अवंतिका ही भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेची दखल सर्वच स्तरांतून घेतली गेली. आजवरचं हे तमन्नाचं सर्वोत्तम काम असल्याचं ही म्हटलं गेलं.

दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये तर तमन्ना भाटिया हे खूप मोठं नाव आहे हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाहीये. त्याचबरोबर तमन्ना आता बॉलीवूड मध्ये ही एक ओळखीचा चेहरा झाली आहे. बॉलिवूड चे अनेक प्रोजेक्ट सध्या तिच्या कडे आहेत. पण कोरोना च्या पार्श्वभूमीवर सध्या या चित्रपटांचं काम रखडलं आहे.

पण ही गोष्ट खूप कमी लोकांना माहीत आहे की तमन्नाने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात बॉलिवूड मधूनच केली होती.होय, खरंतर ही गोष्ट ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसेल, परंतु ही गोष्ट तितकीच खरी आहे. तमन्नाने चित्रपट सृष्टीतील पदार्पण एका हिंदी चित्रपटा तुन केलं होतं आणि ते ही तब्बल 16 वर्षांपूर्वी.

तमन्ना भाटियाचा पहिला बॉलिवूड चित्रपट ‘एंटरटेनमेंट किंवा हिम्मतवाला’ नसून ‘चांद सा रोशन चेहरा’ हा होता. हा चित्रपट 2005 साली प्रदर्शित झाला होता. शाबाह शामसी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केले होते आणि अभिनेता देखील नवखा होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला आणि सुपर फ्लॉप ठरला त्यानंतर तमन्ना ला आणखी काही सिनेमे मिळाले पण बॉलिवूडमध्ये तिने अभिनय केलेल्या प्रत्येक चित्रपटात तमन्ना ही फ्लॉप ठरली. तिच्या सोबत घडलेल्या या घटनेमुळे तिने बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला आणि दाक्षिणात्य चित्रपटा वर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला.

तमन्ना चा हा निर्णय अगदी योग्य ठरला कारण दाक्षिणात्य चित्रपटात ती सुपारहिट झाली. आजच्या घडीला तमन्ना भाटिया दाक्षिणात्य चित्रपट सृष्टी मध्ये टॉप अभिनेत्री पैकी एक गणली जाते. आणि त्याच जोरावर ती बॉलिवूड मध्ये देखील पुन्हा दाखल झाली आहे. एकामागून एक अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे देणारी तमन्ना आता बॉलिवूड आणि साऊथ सिनेसृष्टीतील नावाजलेले नाव ठरले आहे. केवळ पडद्यावरच नव्हे तर खासगी आयुष्यातसुद्धा तमन्ना एखाद्या राजकुमारीसारखे आयुष्य जगते.तमन्नाचे वडिल हे हिरे व्यापारी आहेत. यावरुन तमन्नाच्या लाइफस्टाइलचा तुम्हाला अंदाजही आलाच असले इतके राजेसाही थाट तिचा असतो

तमन्ना सध्या तेलुगू चित्रपट ‘सीटीमार’चे चित्रीकरण सुरु होण्याची वाट पहात होती. या चित्रपटात गोपीचंद मुख्य भूमिकेत असून हा एक अ‍ॅक्शन ड्रामा आहे. तमन्नाचा आणखी एक हिंदी चित्रपट ‘बोले चुडिया’ रिलीजसाठी सज्ज आहे. रिपोर्ट्सनुसार, तमन्ना ज्या वेब सीरिजची शूटिंग करत होती, सध्या त्याचे चित्रीकरण बंद करण्यात आले आहे.

अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या तामिळ, तेलगु, मराठीसोबतच अनेक चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. बॉलिवूडमधील ‘खामोशी’ आणि ‘चोर निकल के भागा’ या आगामी चित्रपटांमध्ये ती झळकणार आहे. नुकतीच ती आपल्या आईसोबत स्पॉट झाली. यावेळी ती रेड टॉप आणि ग्रे पँटवर दिसली.

admin