करिनाचा होता हा हट्ट, नाहीतर तैमूर चे नाव असते काहीतरी वेगळेच.

करिनाचा होता हा हट्ट, नाहीतर तैमूर चे नाव असते काहीतरी वेगळेच.

गेल्या रविवारी सकाळी करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांनी त्यांच्या दुसर्‍या मुलाचे स्वागत केले आणि या जोडप्यांना चहूबाजूंनी अभिनंदन संदेश मिळायला लागले. आलिया भट्ट, दिया मिर्झा, नताशा पूनावाला, नीतू कपूर, रिद्धिमा कपूर साहनी आणि बर्‍याच जणांनी सैफ आणि करीनाला शुभेच्छा दिल्या.

करीना आणि सैफ या नवजात बाळाला काय नाव देतील याबद्दल चाहत्यांमध्ये बरीच खळबळ आहे. पहिल्या मुलाच्या जन्माच्या वेळी, २०१६ मध्ये करीना आणि सैफचा पहिला मुलगा तैमूरच्या नावामूळे वादविवाद झाला होता आणि बर्‍याच लोकांनी या नावावर टीका केली कारण ते भारतावर आक्रमण करणाऱ्या तुर्की राजाचे नाव सुद्धा तैमुरच होते.

तुम्हाला माहित आहे का, की जेव्हा करीनाने आपला पहिला मुलाचे नाव म्हणजे तैमूर चे नाव निवडले होते तेव्हा सैफ अली खानच्या मनात आणखी एक नाव होते? २०१८ मध्ये करीना कपूर खानने तैमूरच्या नावावर सुरू असलेल्या वादाबद्दल बोलताना हे सांगितले.

इंडिया टुडे शी बोलताना अभिनेत्री म्हणाली की ती रूग्णालयात जाण्याच्या आदल्या रात्री सैफने तिला विचारले की तिला आपला मुलाचे नाव तैमूर च ठेवायचे ही खात्री आहे का?

सैफ ला आपल्या पहिल्या मुलाचे नाव ‘फैज’ ठेवायचे होते कारण ते अधिक काव्यात्मक आणि रोमँटिक वाटते. अशी सूचनाही त्यांनी केली. तथापि, करिना ठाम होती की मुलगा झाला तर त्याला तैमूर हे नाव द्यायचे कारण तिला आपला मुलगा शूरवीर व्हावा अशी इच्छा होती आणि तैमूर म्हणजे ‘पोलाद’. आपल्या मुलाचे नाव तैमूर ठेवण्यात मला गर्व आहे असे करिनाने सांगितले.

करीना कपूर खानने आपल्या दुसऱ्या मुलाच्या नावाबद्दल बोलताना नेहा धुपियाशी ‘व्हॉट वुमन वांट शो’ वर बोलताना उघड केले की तिने आणि सैफने मुलाचे नाव आधीच ठरवले नाहीये.

करीना म्हणाली, ‘तैमूरच्या संपूर्ण वादानंतर सैफ आणि मी दोघांनीही याबद्दल विचार केला नाही. आम्ही शेवटच्या क्षणी त्याचे निराकरण करू. ‘ सैफ आणि करिनाने आपल्या दुसर्‍या मुलाला ‘फैज’ हे नाव देतील का जे पहिल्या मुलासाठी सैफ अली खानने निवडले होते हे आता पाहणे देखील रंजक ठरणार आहे.

admin