करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या दुसऱ्या मुलाचे नाव झाले कन्फर्म..

करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या दुसऱ्या मुलाचे नाव झाले कन्फर्म..

करीना कपूर आणि सैफ अली खान यांना नुकताच एक गोंडस मुलगा झाला आहे. दरम्यान सोशल मीडिया व भारतीय प्रेक्षकांना सैफ अली खान व करीना आपल्या बाळाचे नाव काय ठेवतील याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. करीना कपूर व सैफ अली खान यांचा पहिला मुलगा तैमुर अली खान याचा जन्म झाला तेव्हा सैफ अली खान यांनी तैमुर करता एक नाव करीना कपूरला सुचवले होते.

तेव्हा त्या नावाबाबत करीना कपूरने नकार दिला होता. असे म्हटले जाते की जेव्हा तैमुरचा जन्म झाला तेव्हा सैफ ने करीनाला आपल्या बाळाचे नाव काय ठेवावे ?असे सुचवले होते! मात्र करीनाने त्यावेळी फैज़ या नावाला नकार देत आपल्या मुलाचे नाव तैमुर म्हणजेच आयर्न मॅन शुर योद्धा ठेवावे असे तिने सांगितले.

करीनाने त्यावेळी असे सांगितले होते की तिला आपल्या मुलाला हिरो नाही तर एक चांगला फायटर बनवायचे आहे! व माझा मुलगा योद्धा आहे असे तिने सांगितले होते. ज्यामुळे इतिहासातील प्रसिद्ध योद्धा तैमुर याच्या नावावरुन करीनाने आपल्या पहिल्या बाळाचे नामकरण तैमुर अली असे ठेवले होते. 2016 रोजी तैमुरचा जन्म झाला होता. तैमुरचे एवढ्या बालवयात करोडो फॅन्स आहेत. भारतासोबत विदेशातही तैमुरचे कौतुक केले जाते.

तैमुरचे नवनवे लुक्स सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. संपूर्ण बॉलिवुड इंडस्ट्रीमध्ये स्टार किड्समध्ये तैमुर सगळ्यात जास्त फेमस व फॅन फॉलोअर असलेला एकमेव सेलेब्रिटी किड आहे. तेैमुर अनेकदा आपल्या ग्लॅमर क्वीन आई करीनासोबत अनेक ठिकाणी स्पॉट होताना दिसतो.

तैमुरच्या कायमच वेगवेगळ्या ठिकाणच्या नवनव्या लुक्सवर प्रेक्षक भरभरुन प्रेम देतात व आशीर्वादही देतात. सोशल मीडिया आणि पापाराजीचा फेवरेट तैमुर आता छान थांबुन पोझेस द्यायला शिकला आहे. बरेचदा कॅमेरामॅनला हातवारे करुन तैमुर फोटो काढायला सांगतो. काही दिवसापुर्वी नोरा फतेहीने तेमुरशी लग्न करण्याचा प्रस्ताव एका टॉक शो मध्ये दिला होता!

तैमुरचे फोटो सगळ्यात जास्त सोशल मीडियावर लाईक मिळवत असतात. तैमुरची एक छबी कॅमेर्‍यात टिपण्याकरता फोटोग्राफर जीवाचा आटापिटा करतात. यामुळे तैमुर अगदी कमी कालावधीमध्ये सगळ्यांचा आवडता व सेलिब्रिटी स्टार किड झाला आहे.

नुकताच तैमुरला छोटा भाऊ आला आहे. त्यामुळे आता तैमुरच्या भावाचे नाव काय ठेवले जाईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे! दरम्यान नवाब पतौडी यांच्या गोटातून अशी खबर आली आहे की कदाचित सैफ अली खान यांनी तैमुरला सुचवलेले जेह हे नाव या बाळाला ठेवण्यात येईल असा अंदाज आहे. ऑफिशिअली तरी अजून सैफ व करीनाच्या दुसऱ्या बाळाचे नाव कन्फर्म झालेले नसले तरी त्त्याचे नाव जेह असणार का? यावर शिक्कामोर्तब होणे अजुन बाकी आहे.

admin