जाणून घ्या काय करते हृतिक ची घटस्पोट झालेली बायको, सध्या सोशल मीडिया वर होतेय ह्या व्हिडिओ मूळे व्हायरल !

जाणून घ्या काय करते हृतिक ची घटस्पोट झालेली बायको, सध्या सोशल मीडिया वर होतेय ह्या व्हिडिओ मूळे व्हायरल !

अभिनेता हृतिक रोशन ज्याला बॉलिवूडचा हँडसम हंक म्हणतात त्याची माजी पत्नी सुझान खान, अनेकदा चर्चेत असते. सुझान सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव आहे.

ती अनेकदा तिचे बरेच व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करते. अलीकडेच सुझानने तिचा असाच एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती वर्कआउट करताना दिसली आहे.

सुझान खान देखील फिटनेस फ्रिक आहे. तीचे सोशल मीडिया अकाऊंट पाहून ह्या गोष्टीचा अंदाज बांधता येतो. सुझानने तिचा वर्कआउट व्हिडिओ नुकताच शेअर केला आहे. तिचा हा व्हिडिओही खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती पुशअप करताना दिसत आहे.

हा व्हिडिओ सुझान खानने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये सुझान मेहनतीने पुशअप करताना दिसत आहे. तीचा हा व्हिडिओदेखील चांगलाच पसंत केला जात आहे. सर्व सेलिब्रिटींबरोबरच त्यांच्या चाहत्यांनीही त्यांच्या या व्हिडिओवर चांगली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मलायका अरोरानेही सुझान खानच्या या व्हिडिओवर इमोजी शेअर करुन प्रतिक्रिया दिली आहे. मलायकाने कमेंट्समध्ये दंडाचे इमोजी शेअर केले आहेत. मलायका व्यतिरिक्त सुझान खानची बहीण फराह खान अली यांनीही इंप्रेस झालेले इमोजी पोस्ट करुन तिला प्रोत्साहित दिले.

सुझान खान पेशाने इंटिरियर डिझाइनर आहे. ‘द चारकोल प्रोजेक्ट’ नावाचा स्वतःचा इंटिरियर डिझाइन स्टुडिओही तीने बनविला आहे. सुझानच्या वैयक्तिक जीवनाबद्दल बोलायचे झाले, तर सुझान खान आणि हृतिक रोशनने वर्ष 2000 मध्ये लग्न केले.

परंतु संबंध चांगले नसल्यामुळे त्यांनी 2014 मध्ये एकमेकांना घटस्फोट दिला. त्यांना रिधन रोशन आणि रिहान रोशन ही दोन मुले आहेत.

admin