कोरोनाच्या भीतीने ‘ही’ अभिनेत्री गेली होती भारत सोडून.. आता कामासाठी पुन्हा भारतात परतल्यावर नेटकऱ्यांनी केलं ट्रोल..

कोरोनाच्या भीतीने ‘ही’ अभिनेत्री गेली होती भारत सोडून.. आता कामासाठी पुन्हा भारतात परतल्यावर नेटकऱ्यांनी केलं ट्रोल..

कोरोना व्हायरसमुळे भारतातच काय तर संपूर्ण जगात हाहाकार माजला आहे. भारतात या व्हायरसच्या प्रसारावर नियंत्रण मिळवण्यासाठी अभूतपूर्व असा लॉकडाऊन लावण्यात आला होता. आता भारतात अनलॉक प्रक्रिया सुरू आहे. असे असले तरी अनेक देशांत आता कोरोनाची दुसरी लाट येण्याची चिन्हे दिसत असल्याने पुन्हा एकदा लॉक डाऊन लागू करण्यात आला आहे.

भारतात मात्र आता परिस्थिती बर्यापैकी आटोक्यात आल्यामुळे देशातील एक एक इंडस्ट्री पूर्ववत करण्याच्या विचारात भारत सरकार आहे. अनेक इंडस्ट्रीज आपल्या पूर्वीच्या प्रवाहात सूरु झाल्याही आहेत. ‘बॉलिवूड’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या आपल्या भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीला देखील कोव्हीडचा मोठा फटका बसला. या काळात चित्रपटांचे शूटिंग पूर्णपणे ठप्प होते. त्यामुळे सर्व कलाकार घरीच बसून होते.

भारतात कोरोना जोर धरत असताना अनेक कलाकार आपल्या मूळ गावी परतले होते. या दरम्यानच बॉलिवूड मधील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात भारतातून अमेरिकेत गेली होती. अमेरिकेतील वैद्यकीय व्यवस्था हे भारतापेक्षा प्रगत असल्याने तिने अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतल्याचे तेव्हा वर्तवले गेले. आम्ही बोलत आहोत बॉलिवूड मधील हॉट आणि बोल्ड अभिनेत्री सनी लिओनी बद्दल.

सनी लिओनी 10 मे रोजी तिचा पती डॅनिअर वेबर आणि तीन मुलं निशा, नूह आणि अशर बरोबर अमेरिकेत गेली होती. कोरोनाच्या संकटकाळात कुंटुंबाबरोबर असणे आवश्यक होते असल्याने, ती अमेरिकेत गेली होती. जेव्हा तिने अमेरिका गाठली त्यावेळी पहिल्याच फ्लाइटनं मुंबईला येण्याची इच्छा आहे, अशी प्रतिक्रिया सनीने दिली होती.

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सनी म्हणाली होती की, ‘सध्याच्या परिस्थितीत माझं आणि डॅनिअलचं त्याची आई आणि कुटुंबासोबत असणं खूप गरजेचं होतं आणि मलाही माझ्या कुटुंबासोबत राहायचं होतं.’ दरम्यान आता पुन्हा एकदा ती कर्मभूमी असणाऱ्या मुंबईत दाखल झाली आहे.

देशभरात सध्या अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे सनी लिओनी देखील मुंबईत परतली आहे. तिने सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली. अमेरिकेत सहा महिने राहिल्यानंतर ती मुंबईत पोहोचली आहे. इन्स्टाग्रामवर फ्लाइटमधील एक फोटो शेअर करत तिने याबाबत माहिती दिली आहे. यावेळी आवश्यक नियमांचे पालन करनाता ती दिसली.

लॉकडाऊन काळातही सनी सोशल मीडियावर सक्रीय होती. तिने तिच्या आयुष्यातील विविध अपडेट्स चाहत्यांना दिले होते. त्याचप्रमाणे कुटुंबाबरोबरचे काही फनी व्हिडीओ आणि फोटो देखील यावेळी सनीने शेअर केले होते.

admin