भाऊ जेल मधून सुटल्याच्या आनंदात, आता बहीण करतीये पार्टी….

भाऊ जेल मधून सुटल्याच्या आनंदात, आता बहीण करतीये पार्टी….

सध्या जगभरातील विविध ठिकाणी हॅलोवीन साजरा केला जातोय. अनेक सेलिब्रिटींनी हॅलोवीन साजरा करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र अशातच सध्या शाहरुखची लेक सुहाना खानच्या फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

सुहाना खान सध्या न्यूयार्कमध्ये तिचं शिक्षण पूर्ण करत आहे. अशातच आर्यन खानच्या सुटकेनंतर आता सुहानाने मोठ्या जल्लोषात हॅलोवीन साजरा केलाय. सुहानाच्या हॅलोवीन पार्टीतील एक फोटो सध्या सोशल मीडिया चांगलाच व्हायरल होतोय.

सुहानाची मैत्रिण प्रियांकाने या हॅलोवीन पार्टीचे काही फोटो शेअर केले आहेत. यात सुहानेन आकाशी रंगाचा ड्रेस परिधान केल्याचं दिसतंय. तसचं ती मित्र-मैत्रिणींसोबत ही पार्टी एन्जॉय करताना दिसतेय. प्रियांकाने शेअर केलेल्या या फोटोंवर सुहानाने ‘आय लव्ह यू’ अशी कमेंट केली आहे.

सुहानाचा भाऊ आर्यन खानला अटक झाल्यानंतर तिने सोशल मीडियावरून काही काळ ब्रेक घेतला होता. सुहानाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कमेंट बॉक्स बंद केला जेणेकरून तिला तिच्या पोस्टवर कुणीही कमेंट करून शकणार नाही. मात्र आर्यन खानच्या सुटकेनंतर सुहना पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय झालीय. नुकताच तिने अनन्या पांडेसोबतचा एक खास फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

शाहरुख खानचा मुलगा आर्यनला ड्र* ग्ज प्रकरणात अटक झाली होती. जवळपास 23 दिवसांनी तो मुंबईतील आर्थर रोड जेलमधून बाहेर पडला. मुंबई उच्च न्यायालयाने विविध १४ अटींवर त्याचा जामीन मंजूर केला आहे.

admin