लॉकडाऊनमध्ये ‘गरिबांचा मसीहा’ ठरलेल्या सोनू सूदची संपत्ती जाणून थक्क व्हाल.. आहे इतक्या कोटींचा मालक..

लॉकडाऊनमध्ये ‘गरिबांचा मसीहा’ ठरलेल्या सोनू सूदची संपत्ती जाणून थक्क व्हाल.. आहे इतक्या कोटींचा मालक..

सेलिब्रिटी मंडळींवर रसिक जीव ओवाळून टाकतात. रसिकांचं या सेलिब्रिटींवर मनापासून प्रेम असतं. रसिकांच्या या प्रेमामुळेच सेलिब्रिटी मंडळी त्यांच्या करिअरमध्ये कोट्यवधींची कमाई करतात.काम कोणतंही असो सोनू सूद त्यात अव्वल…

अभिनय असो किंवा इतर कोणतंही काम त्यात तो कोणतीही कसर सोडत नाही. प्रत्येक कामात एव्हरेडी असणारा सळसळता उत्साह, जोष, जल्लोष आणि मेहनत हेच सोनू सूदच्या यशाचे खरं कारण आहे. त्याच्या वागण्या, बोलण्यात कुठलाही बडेजावपणा जाणवत नाही.

लॉकडाऊनच्या काळात लोकांना केलेल्या मदतीमुळे बॉलिवूड अभिनेता सोनू सूद देशभरात ‘मसीहा’ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. सोनूला देशभरातून खूप प्रेम आणि पाठिंबा मिळत आहे. अभिनेता सोनू सूदचा जन्म पंजाबमधील एका गावात झाला होता. त्यानंतर तो अभिनेता होण्यासाठी मुंबईत आला.

या अभिनेत्याने हिंदी, तेलुगु, तामिळ, कन्नड आणि पंजाबी चित्रपटांमध्ये दमदार अभिनय केला आहे. लॉकडाऊन दरम्यान गरजवंतांना आवश्यक ती सगळी मदत करणाऱ्या सोनूकडे नेमकी किती संपत्ती आहे? चला तर जाणून घेऊया…

caknowledge.com नुसार सोनू सूदकडे एकूण 130 कोटींची संपत्ती आहे. सोनू सूद गेल्या 2 दशकांपासून बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करत आहे. ज्यामुळे त्याची फॅन फॉलोईंग खूप जबरदस्त आहे. ब्रँड अ‍ॅन्डॉर्समेंट ही त्याच्या उत्पन्नाचा एक प्रमुख स्त्रोत आहे. त्याने सलमान खानसोबत ‘दबंग’ या चित्रपटामध्येही काम केले आहे.

त्याचवेळी शाहरुख खानसोबत ‘हॅपी न्यू इयर’ मध्ये काम केले होते. सोनू आपल्या पत्नी आणि मुलांसमवेत मुंबईत राहतो. सोनू सूद याच्या पत्नीचे नाव सोनाली सूद आहे. सोनू नागपुरात शिकत असताना त्याची सोनालीशी भेट झाली. याचदरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी 1996 मध्ये लग्न केले.

सोनू सूद मुंबईतील लोखंडवाला भागात 2600 चौरस फुटांच्या घरात राहतो. सोनूचे हे घर 4 बीएचके आहे. यासह सोनूचे मुंबईत आणखी दोन फ्लॅट आहेत. त्याच वेळी, त्याचे जुहूमध्ये एक हॉटेल देखील आहे. याशिवाय सोनूचे मुंबईतही काही कॉफी पॉईंट्स आहेत. जिथे बसून लोक कॉफी पीत संध्याकाळचा आनंद घेतात.

सोनू सूदकडे एक मर्सिडीज बेंझ एमएल क्लास 350 सीडीआय कार आहे. या कारची किंमत 66 लाख रुपये आहे. त्याच वेळी, त्याच्याकडे ऑडी क्यू 7 ही कार देखील आहे. या गाडीची किंमत 80 लाख रुपये आहे. इतकेच नाही, तर त्याच्याकडे पोर्शची पनामा कार देखील आहे, ज्याची किंमत 2 कोटी आहे. सोनू सूदला इशांत आणि अयान नावाचे दोन मुलगे आहेत, ते कधीकधी वडिलांसोबत फिरताना दिसतात.

अभिनेता सोनू सूदने या कठीण काळात मदतीचा हात पुढे करत भारतीयांच्या हृदयात ज्याप्रकारे स्थान निर्माण केले आहे, ते विशेष आहे. लोकांना मदत करण्यात अभिनेता नेहमीच पुढे असतो. गेल्या वर्षापासून तो दररोज हजारो लोकांना मदत करत आहे. त्याने लोकांना घरं, पैसा, औषध आणि नोकर्‍या देखील उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्याच्या घरी आजकाल लोकांची गर्दी दिसत आहे. सोनू राहत असलेल्या ठिकाणी लोक त्याच्याकडे मदत मागण्यासाठी येत आहेत.

admin