सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीच्या लग्नाचे फोटो आले समोर, पहा फोटोज…

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीच्या लग्नाचे फोटो आले समोर, पहा फोटोज…

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी आज ७ फेब्रुवारी लग्नबंधनात अडकले. राजस्थानच्या जैसलमेर या ठिकाणी असलेल्या सूर्यगढ पॅलेस त्या दोघांनी सप्तपदी घेत लग्नगाठ बांधली. आता त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.

नुकतंच त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याची झलक दाखवली आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. “आता आमची कायमस्वरुपी बुकींग झाली आहे. आमच्या पुढील वाटचालीसाठी तुमचे आशीर्वाद आणि प्रेम राहू द्या”, असे कॅप्शन सिद्धार्थने हे फोटो शेअर करताना दिले आहे.

सिद्धार्थने शेअर केलेल्या या फोटोत ते दोघेही फारच गोड दिसत आहेत. यावेळी सिद्धार्थने गोल्डन रंगाची शेरवानी, फेटा असा लूक केला होता. तर कियाराने गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला होता. याबरोबर तिने हिरव्या रंगाचा नेकलेस आणि ज्वेलरी असा लूक केला होता.

यातील पहिल्या फोटोत ते दोघेही एकमेकांसमोर हात जोडताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत ते दोघेही एकमेकांकडे पाहून हसताना दिसत आहेत. तर एका फोटोत कियारा ही सिद्धार्थच्या गालावर किस करताना पाहायला मिळत आहे. दरम्यान आज मंगळवारी ७ फेब्रुवारीला सिद्धार्थ आणि कियाराने सप्तपदी घेतली.

सिद्धार्थ कियाराच्या अफेअरची चर्चा खूप दिवसांपासून सुरू होती. पण दोघांनीही कधीच त्यांच्या नात्याची कबुली दिली नव्हती. पण आता मात्र ते दोघेही लग्नाच्या पवित्र बंधनात अडकले आहेत. विशेष म्हणजे आजच संध्याकाळी त्यांचा रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सूर्यगढ पॅलेसमध्येच हा रिसेप्शन सोहळा पार पडला.

admin