या बॉलिवूड अभिनेत्रींनी केले आहे श्रीमंत उद्योगपतींशी लग्न, 3 नंबरच्या अभिनेत्रीचा पती आहे खूपच श्रीमंत

या बॉलिवूड अभिनेत्रींनी केले आहे श्रीमंत उद्योगपतींशी लग्न, 3 नंबरच्या अभिनेत्रीचा पती आहे खूपच श्रीमंत

सोनम कपूर – सोनम कपूरने वर्ष 2018 मध्ये व्यावसायिक आनंद आहूजाशी लग्न केले. सोनम कपूर ही बॉलिवूडची पहिली अभिनेत्री नाही जिने बिझनेसमनशी लग्न केले आहे. अशा बर्‍याच अभिनेत्री आहेत त्यांनी बिझनेसमन व्यक्ती सोबत लग्न केले आहे. आम्ही आज अशाच काही बॉलीवूडच्या अभिनेत्रींची ओळख करून देणार आहे.

टीना मुनीम – आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात खास स्थान निर्माण करणारी अभिनेत्री टीना मुनीमचे लग्न देशातील प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांच्याशी झाले आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, अनिलयांना टिनाला प्रथम पाहिल्यावरतीच प्रेम झाले होते. यानंतर दोघांनी 1991 साली लग्न केले. लग्नानंतर टीना मुनिमने बॉलिवूड मध्ये काम करायचे सोडून दिले.

आयशा टाकिया – वांटेड, संडे आणि डोर सारख्या चित्रपटांमुळे सर्वत्र चर्चेत आलेली अभिनेत्री आयशा टाकियाने बिझनेसमन फरहान आझमीशी लग्न केले आहे. 2009 साली त्यांनी लग्न केले. यापूर्वी दोघांनीही बर्‍याच दिवसांपासून एकमेकांना डेट केले होते. फरहान आझमीची मुंबई आणि गोव्यात अनेक रेस्टॉरंट्स आहेत. फरहान हा समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचा मुलगा आहे.

जूही चावला – जूही चावला बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे. 90 च्या दशकात त्याने एकापेक्षा एक सुपर हिट चित्रपट दिले आहेत. जूही चावला यांनी जय मेहता बरोबर लग्न केले. जय मेहता हे मोठे व्यावसायिक आहेत. जूही चावला आणि जय मेहता यांनी 1995 साली लग्न केले. जय मेहता ‘मेहता ग्रुप’चे मालक आहेत.

असिन –रेडी आणि गजनी सारख्या सुपरहिट चित्रपटात दिसणारी अभिनेत्री असिनचा नवरा देखील एक बिझनेसमन आहे. तिच्या पतीचे नाव राहुल शर्मा आहे. राहुल हा रिव्होल्ट मोटर्सचा मालक आहे. एवढेच नव्हे तर तो मायक्रोमॅक्स या मोबाइल फोन कंपनीचा सह-संस्थापकही आहे. 2016 मध्ये असिन आणि राहुलचे लग्न झाले.

admin