हा भारतीय वेगवान गोलंदाज श्रद्धा कपूरच्या प्रेमामध्ये आहे पागल, नाव जाणून चकित व्हाल..

हा भारतीय वेगवान गोलंदाज श्रद्धा कपूरच्या प्रेमामध्ये आहे पागल, नाव जाणून चकित व्हाल..

क्रिकेट आणि बॉलिवूडचे नाते फार काळापासून चालू आहे, अनेक बड्या क्रिकेटर्सनी बॉलिवूड अभिनेत्रींशी लग्न केले आहे. नवाब पटौदी यांनी शर्मिला टागोरशी लग्न केले तर, भारतीय संघाचा कर्णधार असलेले मोहम्मद अझरुद्दीन यांनीही बॉलिवूड अभिनेत्रीशी लग्न केले.

सध्याचा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यांनीही बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सोबत लग्न केले आहे. आज आपण अशा बॉलरबद्दल बोलणार आहे तो अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या प्रेमामध्ये पूर्ण वेडा आहे.

अभिनेत्री श्रद्धा कपूरने अनेक दमदार चित्रपट केले आहेत. तिचे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले आहेत. श्रद्धाने महेश भट्ट यांच्या आशिकी २ चित्रपटामधून प्रदार्पण केले आहे. एक अभिनेत्री म्हणून श्रद्धा कपूरची खूप फॅन फॉलोव्हिंग आहे. पण भारतीय क्रिकेट संघात एक गोलंदाज आहे ज्याला श्रद्धा खूप आवडते. भुवनेश्वर कुमार असे या गोलंदाजांचे नाव आहे.

श्रद्धा कपूर ही अभिनेता शक्ती कपूरची मुलगी आहे, परंतु आपल्या कामाच्या जोरावर तिने लोकांच्या हृदयात वेगळेच स्थान मिळवले आहे. आशिकी 2 ने आपल्या करिअरची सुरुवात करणार्‍या श्रद्धा कपूरने आतापर्यंत अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे, तिने बागी, छिछोरे, साहो, एक विलेन इत्यादी मोठ्या चित्रपटांचा समावेश आहे.

आवडती अभिनेत्री कोण आहे असे एका मुलाखतीदरम्यान भुवनेश्वर कुमारला विचारले असता त्याने श्रद्धा कपूरचे नाव घेतले. आणि सांगितले की त्यांना श्रद्धा कपूर खूप आवडते, आणि पुढे म्हणाला कि मला श्रद्धा कपूरचे चित्रपट बघायला खूप आवडतात.

भुवनेश्वर कुमार यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1990 रोजी उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यात झाला आहे. किरण पालसिंग मावी असे त्याच्या वडिलांचे नाव असून ते उत्तर प्रदेश पोलिसात कार्यरत आहेत. त्याची आई इंद्रेश मावी घरगृहिणी आहे.

भुवीचे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील गुलावती शहर जवळील लुहारली गावात आहे. भुवनेश्वरला क्रिकेट विश्वात आणण्याचे श्रेय त्यांची बहीण रेखा अढाना यांना जाते.

admin