‘ह्या’ अभिनेत्रीला लागली कर्जतच्या वडापावची चटक.. डाएटला फाट्यावर मारून वडापाववर मारला ताव..

‘ह्या’ अभिनेत्रीला लागली कर्जतच्या वडापावची चटक.. डाएटला फाट्यावर मारून वडापाववर मारला ताव..

‘वडापाव’ हा आता केवळ एक खाद्यपदार्थ राहिलेला नसून मुंबईकरांसाठी एक जिव्हाळ्याचा विषय आहे. श्रीमंत असो वा गरीब , सर्वांच्या खिशाला परवडणारा चमचमीत पदार्थ म्हणजे वडापाव. काही लोक नाश्त्याला खातात तर काही लंच मध्ये. पण एक गोष्ट।मात्र नक्की की हा वडापाव लाखो लोकांच्या पोटाची खळगी भरतो.. ते ही अगदीच कमी किमतीत..

मस्त काढईतुन काढलेला गरमागरम खुसखुशीत वडा, सोबत पाव, आवडीनुसार तिखट गोड चटणी आणि सोबत मिरची असं चित्र समोर येताच तोंडाला पाणी आल्याशिवाय राहत नाही. लॉकडाऊन मध्ये तर हा वडा पाव सगळ्यांनीच मिस केला. मग ते सामान्य व्यक्ती असो किंवा एखादी सेलेब्रिटी. अनेकांनी घरीच वडापावचे बेत आखले.. परंतु गाड्यावरच्या वडा पावची सर कशालाच नाही हे सर्वमान्य सत्य आहे.

बॉलिवूड मधील ही अनेक स्टार्स हे वडापावचे चाहते आहेत. नुकताच वडापावचा एक किस्सा बॉलिवूड मध्ये भलताच फेमस होतोय. किस्सा आहे एका अभिनेत्रीचा आणि तिच्या वडापाव वर असलेल्या प्रेमाचा. तुम्हाला जाणून आश्चर्य होईल, एक अशी अभिनेत्री, जिचे लाखो दिवाने आहेत ती मात्र दिवानी आहे वडापावची.

तर आम्ही बोलत आहोत सुप्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी बद्दल. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की शिल्पा शेट्टी, जिने आपल्या अदाकारीने तिच्या चाहत्यांना वेड लावलं आहे, तीला मात्र वेड लावलंय वडापावने. तेही महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेल्या कर्जतच्या वडपावने. काय आहे किस्सा जाणून घेऊयात.

तर झालं असं की, नुकतंच काही दिवसांपूर्वी शिल्पा शेट्टी आपलं शूटिंग आटोपून कर्जत वरून मुंबईला येत होती. परत येताना तिला रस्त्यावर वडापावची एक गाडी दिसली. एरव्ही आपल्या फिटनेस बद्दल थोडंफारही कोंप्रोमाईज न करणाऱ्या शिल्पाचा, गरमागरम वडापाव बघून मात्र मोह नाही आवरला. तिने गाडी थांबवली आणि वडापाववर ताव मारला.

शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये ती तिच्या गाडीत बसून वडापाव खाण्याचा आनंद लुटताना पाहायला मिळतेय. ‘चलते चलते देखा वडापाव, मन ने बोला संडे है तो खाओ खाओ खाओ.. बनता है भाऊ’, असं गमतीशीर कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे.

शिल्पाने केवळ वडा पावचा आनंद लुटला नाही तर तिने समोसा, कांदा भाजी आणि पालक भजीही खाल्ले. शिल्पाच्या कॅलरीमध्ये लक्षणीय वाढ झाली असावी हे आता स्पष्ट झाले आहे. शिल्पाच्या या फोटोवर चाहत्यांच्या बर्याच प्रतिक्रिया आहेत. शिल्पाची ही स्टाईल सर्वांनाच खूप आवडते. तसे, शिल्पा एक योगा ट्रेनर आहे आणि ती लोकांना फिटनेस मंत्र देत राहते. बरेच लोक तिच्या फिटनेस मार्गदर्शनाचे अनुसरण करतात.

शिल्पाच्या या व्हिडीओला इन्स्टाग्रामवर वीस लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून असंख्य नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी असं कोरोनाच्या काळात बाहेरचं खाणं चांगलं नसल्याचे सांगितले. तर अनेकांनी तिच्या ह्या कृतीची वाहवा करत बर्गर, पिझ्झा अश्या खाण्यापेक्षा मराठमोळा वडापाव कधीही उत्तमच असे सांगितले.

admin