मीरा कपूर सोबत लग्न होण्यापूर्वी ह्या अभिनेत्री सोबत शाहिद कपूर लग्न जमले होते

मीरा कपूर सोबत लग्न होण्यापूर्वी ह्या अभिनेत्री सोबत शाहिद कपूर लग्न जमले होते

काही वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावर एक गाने धुमाकूळ घालत होते. ते गाणे होते आखो मे तेरा ही चेहरा, असे हे गाण्याचे बोल होते.या गाण्यामध्ये एक गोंडस चेहरा दिसत होता. त्या अभिनेत्याचे नाव होते शाहिद कपूर. यानंतर त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. काही चित्रपटात काम केले. मात्र, त्याला यश मिळाले नाही.

काही वर्षांपूर्वी त्याने करीना कपूर सोबत जब वी मीट हा चित्रपट केला होता. या चित्रपटात त्यांची केमिस्ट्री एवढी जुळली होती की, हा चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरश डोक्यावर घेतला होता. या चित्रपटात दोघांचा अभिनय अतिशय दर्जेदार असा झाला होता. विशेष करून करीना कपूर हिचे काम प्रेक्षकांना खूप आवडले होते. त्यानंतर दोघांचे प्रेम प्रकरण सुरू झाल्याचे सांगण्यात येते.

मात्र, काही वर्षांनंतर या दोघांमध्ये ब्रेक-अप झाले आणि करिना कपूर हिने सैफ अली खान सोबत लग्न केले. त्यानंतर शाहिद कपूर हा एकटा पडला होता. त्यानंतर मीरा कपूर सोबत लग्न केले. शाहिद कपूर प्रसिद्ध अभिनेते पंकज कपूर यांचा मुलगा आहे. शाहिद याने आपल्या करिअरमध्ये अनेक चढ-उतार पाहिले आहेत. असे असले तरी त्याने हार मानली नाही. त्याचा इश्क विश्क हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटामध्ये सोबत अमृता राव ही दिसली होती.

अमृता राव आणि या दोघांची केमिस्ट्री ही खूपच चर्चेत आली होती. त्यानंतर या दोघांच्या प्रेमप्रकरणाच्या बातम्या देखील खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत आल्या होत्या. मात्र, कालांतराने या दोघांचे प्रेमप्रकरण संपुष्टात आल्याचे सांगण्यात येते. आज आम्ही आपल्याला शाहिद कपूर आणि अमृता राव यांच्या बद्दल माहिती सांगानार आहोत.

अमृता राव शाहिद कपूर यांनी अनेक चित्रपटात काम केले होते. मात्र, खऱ्या अर्थाने त्यांची केमिस्ट्री ही विवाह या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट प्रेक्षकांनी अतिशय डोक्यावर घेतला. या चित्रपटाची निर्मिती राजश्री प्रॉडक्शनने केली होती. हा चित्रपट राजश्री प्रॉडक्शनच्या धाटणीत बसणारा होता. टिपिकल अशी कौटुंबिक कथा या चित्रपटात दाखवण्यात आली होती. त्यानंतरही दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले.

मात्र, त्यानंतर दोघांचे प्रेमप्रकरण बहरत असल्याचे देखील सांगण्यात येते. दोघे लग्न करणार होते, असे देखील सांगण्यात आले होते. मात्र, कालांतराने दोघेही वेगळे झाले. अमृता हिने अनेक चित्रपटात काम केलेले आहे. तसेच तिने टेलिव्हिजनवर देखील काम केले आहे. मेरी आवाज ही मेरी पहचान है, ही टेलिव्हिजनवर तिची मालिका चांगली गाजलेली आहे.

यासोबतच तिने मै हू ना, आपके बरस, द लिजंड ऑफ भगतसिंग, दिवार, मस्ती इश्क विश्क या चित्रपटात काम केले आहे. या सर्व चित्रपटातील तिच्या भूमिका खूप गाजल्या याशिवाय तिने अनेक चित्रपटात काम केले आहे.

ठाकरे चित्रपटातील भूमिका गाजली

दोन वर्षांपूर्वी आलेल्या ठाकरे या चित्रपटात देखील तिने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नीची भूमिका चित्रपटात साकारलेली आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी याने बाळासाहेब यांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट प्रचंड गाजला होता. अमृता हिने 2016 मध्ये आरजे अनमोल याच्यासोबत लग्न केले असून दोघेही आता सुखी संसार करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

admin