सारा अली खान करतेय ह्या प्रसिध्द अभिनेत्याला डेट?? फोटोज् होताहेत वेगाने व्हायरल…

सारा अली खान करतेय ह्या प्रसिध्द अभिनेत्याला डेट?? फोटोज् होताहेत वेगाने व्हायरल…

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. मध्यांतरी सारा अली खान आणि अभिनेता कार्तिक आर्यन सतत सोबत दिसायचे म्हणून ते रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता हे दोघे सोबत दिसतं नसल्याने या सगळ्या चर्चांना पुर्णविराम लागला आहे.

दरम्यान आता सारा सोबत दक्षिणात्य सुपरस्टारच नाव जोडलं जातं आहे.दक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता विजय देवरकोंडा आणि सारा यांना बऱ्याच वेळा एकत्र पाहिलं गेलं आहे. पण खरचं हे दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत का? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांसमोर आहे.

“फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा याने काही दिवसांपुर्वी एका पार्टीचे आयोजन केले होते. त्यावेळी सारा आणि विजय पार्टीमध्ये पुर्णवेळ सोबत होते. या पार्टीत अनेक कलाकार आले होते. मात्र सगळ्यांचे लक्ष हे विजय आणि सारावर होते.” असे वृत्त पिंकव्हिलाने दिल्याचे आजतकने म्हटले आहे.

दरम्यान, सारा आणि विजय चित्रपटासाठी एकत्र येत असल्याच्या चर्चा देखील सुरू झाल्या आहेत. विजयचा ‘Liger: साला क्रॉसब्रीड’ हा चित्रपट ९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विजयसोबत अभिनेत्री अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन पुरी जगन्नाथ हे करणार असून चित्रपटाची निर्मिती करण जोहर करणार आहे.

admin