ह्या आहेत बॉलिवूड मधल्या संस्कारी जोड्या, ज्यांनी घरच्यांच्या सांगण्यावरून केलंय लग्न

ह्या आहेत बॉलिवूड मधल्या संस्कारी जोड्या, ज्यांनी घरच्यांच्या सांगण्यावरून केलंय लग्न

पूर्वीच्या काळी वडीलधारी मंडळी ज्या मुलासोबत किंवा मुली सोबत लग्न करा, असे सांगायचे, त्याप्रमाणे ती मुले लग्न करायचे. मात्र, कालांतराने हा ट्रेंड बदलत गेला. मुलगा किंवा मुलीच्या पसंतीनेच लग्न होऊ लागले. सध्याच्या जमान्यात तर मुलगा किंवा मुलगी हे आधीच आपला जोडीदार ठरवून टाकतात. त्यानंतर पालकांना सांगतात. मात्र, काही कुटुंबात अजूनही वडीलधाऱ्यांना मान देण्यात येतो.

जर आपण बॉलीवूडची गोष्ट कराल तर बॉलिवूडमध्ये देखील अनेकांचे प्रेमप्रकरण असतात. त्यामुळे परस्पर लग्न करत आहे. ते एकमेकांसोबत राहत असतात. बॉलीवूडची अशी काही जोडपी आहेत की, ज्यांनी कुटुंबियांच्या संमतीने आपले लग्न केले. यातील एका अभिनेत्याने तर आपल्या वडिलांच्या पसंतीने लग्न केले आहे. तर मग जाणून घेऊया कोण आहेत या जोड्या..

1) शाहिद कपूर, मीरा राजपूत : बॉलिवुडमध्ये शाहिद कपूरला आज कोण ओळखत नाही. काही वर्षांपूर्वी शाहिद कपूर, करीना कपूर यांचे प्रेम प्रकरण होते. या दोघांचे प्रेमप्रकरण एवढे वाढले होते की, दोघे आता लग्न करणार आहेत अशा बातम्या देखील माध्यमांमध्ये प्रसारित झाल्या होत्या.

कालांतराने करीना कपूर आणि शाहिद कपूर यांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर करीना हिने सैफ अली खान सोबत लग्न केले. त्यानंतर शाहिद कपूर याने मीरा राजपूतसोबत लग्न केले. मीरा राजपूत हीचे वडील आणि शाहिद कपूरचे वडील पंकज कपूर हे एका धार्मिक कार्यक्रमात सोबत भेटले होते. त्यानंतर दोघांची ओळख झाली. त्यानंतर पंकज कपूर यांनी मीरा हिला शाहीदसाठी पसंत केले.

2) करण पटेल, अंकिता भार्गव : छोट्या पडद्यावर करण पटेल आणि अंकिता भार्गव यांचे नाव चांगलेच गाजले आहे. करण पटेल हा ये हे मोहब्बते या मालिकेतून छोट्या पडद्यावर झळकला आहे. करण पटेल याचे सासरे देखील त्याच मालिकेत काम करतात. हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल. मात्र ,हे खरे आहे. अंकिता हिचे वडील हे मोहब्बते या सिरीयल मध्ये काम करतात. 2015 मध्ये त्यांनी एक पार्टी दिली होती. या पार्टीत करण आणि अंकिता ची ओळख झाली. त्यानंतर दोघांनी लग्न केले.

3) विवेक ओबेराय, प्रियंका अलवा : 2012 पर्यंत विवेक ओबेराय आचे ऐश्वर्या राय सोबत प्रेम प्रकरण चांगलेच चर्चेत होते. कालांतराने दोघांमध्ये ब्रेकअप झाले. त्यानंतर ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन सोबत लग्न केले. त्यानंतर विवेकचे वडील सुरेश ओबेराय यांनी त्यांचे मित्र व कर्नाटकचे मंत्री जीवराज यांची मुलगी प्रियंकासोबत विवेक याचा विवाह ठरवला. त्यानंतर दोघांनी लग्न केले. प्रियंका ही फेमस डान्सर आहे.

4) माधुरी दीक्षित, श्रीराम नेने : माधुरी दीक्षित हिचे संजय दत्त याच्या बरोबर नाव जोडले गेले होते. त्यानंतर मिथुन चक्रवतीसोबत तिचे नाव जोडले गेले. मात्र, काही वर्षांपूर्वी तिने डॉक्टर श्रीराम नेने यांच्या सोबत लग्न केले. त्यानंतर ती अमेरिकेत होती. तिला दोन मुले देखील आहेत. मात्र, काही वर्षांपूर्वी भारतात पुन्हा परतली आहे आणि आता भारतात राहू लागली आहे.

5) धनुष, ऐश्वर्या : धनुष दक्षिणेतील सुपरस्टार आहे. धनुष याचे वडील देखील प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. त्यांचे नाव कस्तूरी राजा असे आहे. धनुषने रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्याच्या सोबत लग्न केले आहे. या दोघांचे लग्न देखील अरेंज मॅरेज आहे.

admin