ऐश्वर्याला बघताच असली हालत झाली होत संजूबाबाची, पण बहिणींनी आधीच दिली होती अशी ताकीद..

ऐश्वर्याला बघताच असली हालत झाली होत संजूबाबाची, पण बहिणींनी आधीच दिली होती अशी ताकीद..

61 वर्षांच्या संजय दत्तने वर्षापूर्वीच कॅन्सरला हरवले. कॅन्सरला मात दिल्यानंतर संजय शूटींगमध्ये बिझी आहे. केजीएफ 2चे शूटींग नुकतेच पूर्ण केल्यानंतर संजूबाबा ‘पृथ्वीराज’च्या सिनेमात बिझी झाला आहे. पण सध्या संजयच्या सिनेमाबद्दल नाही तर त्याच्या एका जुन्या मुलाखतीबद्दल आम्ही सांगणार आहोत.

सध्या सोशल मीडियावर हा जुना किस्सा व्हायरल होतोय आणि हा किस्सा ऐश्वर्या रायशी संबंधित आहे.होय, संजूबाबा कधीकाळी ऐश्वर्याच्या सौंदर्यावर जाम फिदा होता. तिचा फोन नंबर मिळवण्यासाठी सैरभैर झाला होता. अगदी काहीही करून त्याला ऐश्वर्या हवी होती. विश्वास बसणार नाही. 1993 सालची ही गोष्ट.

ऐश्वर्या तेव्हा मॉडेलिंग करत होती आणि यादरम्यान संजय व ऐश्वर्याने एकत्र फोटोशूट केले होते. तेव्हा ऐश्वर्याने ना मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला होता, ना सलमानसोबत तिचे अफेअर होते. संजय मात्र एक सुपरस्टार होता आणि त्यावेळी तो ऐश्वर्यावर भाळला होता.

ऐश्वर्यासोबतच्या फोटोशूटनंतर संजयने एक मुलाखत दिली होती. ऐश्वर्याला या फोटोशूट आधी तू ओळखत होतास का? असा सवाल संजयला विचारण्यात आला होता. यावर त्याने दिलेले उत्तर ऐकून सगळेच हैराण झाले होते. ‘मी तिला ओळखत नव्हतो. पण आमिर खानसोबत एका सॉफ्ट ड्रिंकच्या जाहिरातीत मी तिला पाहिले होते आणि तिला पाहताच तिच्यावर फिदा झालो होतो.

ही सुंदर मुलगी कोण आहे? असा प्रश्न मला पडला होता. पण तिच्यासोबत फोटोशूट करण्याची संधी मिळाली तेव्हा माझ्या बहिणींनी मला आधीच बजावले होते. तिला फोन नंबर घ्यायचा नाहीस, तिला फूस लावायची नाहीस, तिला फूलं पाठवायची नाहीत, असे माझ्या बहिणींनी माझ्याकडून वदवून घेते होते,’ असे संजयने या मुलाखतीत सांगितले होते. कारण त्यावेळी संजयची इमेज एका बॅड ब्वॉयची होती.

मुलाखतीत संजयने ऐशवर अक्षरश: कौतुकाचा वर्षाव केला होता. ऐश्वर्या रस्त्यावर उभी झाली तर गाड्या जागच्या जागी थांबतील. तिथेच मी उभा झालो तर सर्व गाड्या माझ्यावर आदळतील, असे तो म्हणाला होता. ऐश्वर्याने 1997 साली मणिरत्नम यांच्या ‘इरूवर’ या सिनेमातून अ‍ॅक्टिंग डेब्यू केला होता.

और प्यार हो गया, हा तिचा पहिला हिंदी सिनेमा होता. पुढे 2005 साली संजय व ऐश्वर्याने ‘शब्द’ या सिनेमात एकत्र काम केले होते. पण हा सिनेमा सुपर फ्लॉप ठरला होता.

admin