जेव्हा ‘या’ व्यक्तीने संजय दत्तला दिली होती ऐश्वर्यापासून दूर राहण्याची धमकी.. तरीही संजू बाबाने काम करून..

जेव्हा ‘या’ व्यक्तीने संजय दत्तला दिली होती ऐश्वर्यापासून दूर राहण्याची धमकी.. तरीही संजू बाबाने काम करून..

ऐश्वर्या रायला सौंदर्याची खाणच म्हटले जाते. सामान्य लोकच नव्हे तर सेलिब्रेटीदेखील तिच्या सौंदर्यावर फिदा आहेत. संजय दत्तची बहीण नम्रता आणि प्रिया या दोघींना ऐश्वर्या इतकी आवडते की, तिच्यासाठी त्यांनी संजय दत्तला धमकी देखील दिली होती.

संजय दत्तने एका मुलाखतीत याविषयी सांगितले होते. संजय दत्त आणि ऐश्वर्या यांनी शब्द, हम किसी से कम नही यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. संजय आणि ऐश्वर्याच्या जोडीला हिट चित्रपट देता आले नसले तरी खाजगी आयुष्यात त्यांची चांगली मैत्री आहे.

दोघांनी चित्रपटांमध्ये एकत्र काम करण्याआधी एका मासिकाच्या कव्हर पेजसाठी शूट केले होते. त्यावेळेचा मजेदार किस्सा संजयने एका मुलाखतीत सांगितला होता. त्यावेळी दोघेही नुकतेच बॉलिवूड मध्ये पदार्पण करत होते आणि इतके काही प्रसिद्ध नव्हते.

संजयने एका मुलाखतीत सांगितले होते की, हा १९९३ चा काळ होता. त्यावेळी ऐश्वर्याने चित्रपटसृष्टीतील तिच्या प्रवासाला देखील सुरुवात केली नव्हती. एवढेच काय तर ती मिस वर्ल्ड देखील बनली नव्हती. पण ती एक प्रसिद्ध मॉडेल होती आणि तिच्या सौंदर्याची त्याकाळात देखील चांगलीच चर्चा होती.

तिने त्यावेळी पेप्सीच्या जाहिरातीत काम केले होते. तिला पाहाताच तिच्या सौंदर्याची मी तारीफ केली होती. नम्रता आणि प्रियाला तर ऐश्वर्या प्रचंड आवडायची. त्यामुळे तिच्यासोबत फोटोशूट करण्याआधीच मला त्या दोघींनी धमकी दिली होती की, तिला पटवण्याचा विचारसुद्धा करू नकोस…. काम करताना तू तिचा नंबर घ्यायचा नाहीये की तू तिला कोणतीही भेटवस्तू देखील द्यायची नाहीये.

संजयच्या आयुष्यावर आधारित असलेल्या ‘संजू’ चित्रपटात दाखवण्यात आल्याप्रमाणे त्याच्या ३०८ गर्लफ्रेण्ड होत्या. संजयच्या या स्वभावाला त्याच्या बहिणी चांगल्याच ओळखून होत्या. त्यावेळेस ऐश्वर्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं नव्हतं.

ती मॉडेलिंग करत होती आणि संजयला ऐश्वर्यासोबत मॉडेलिंग करण्याची ऑफर आली होती. त्यावेळेस संजयच्या बहिणींनी त्याला ऐश्वर्यासोबत मोजकंच बोलण्याचा आणि जवळीक न वाढवण्याचा सल्ला दिला होता. खरं तर तो सल्ला नसून एक प्रकारची धमकीच होती.

त्यांनी संजयला ऐश्वर्याचा नंबर मागायलादेखील मनाई केली होती. शिवाय संजयने ऐश्वर्याला फुलं पाठवलेली देखील त्यांना चालणार नव्हती.

admin