कतरीना-विकीच्या लग्नानंतर आता धक्कादायक सत्य आले समोर, स्वतः सलमान…

कतरीना-विकीच्या लग्नानंतर आता धक्कादायक सत्य आले समोर, स्वतः सलमान…

सलमान खान हा चित्रपट जगतातील एक असा स्टार आहे ज्याचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. त्याच्या आयुष्यात अनेक मुली आल्या, पण शेवटी सलमान खानला त्याच्या तुटलेल्या मनानेचं जगावे लागले. वृत्तांवर विश्वास ठेवला तर सलमान खान सध्या युलिया वंतूरला डेट करत आहे.

पण एक व्यक्ती अशी आहे जिच्याशी सलमान खानचे खास अटॅचमेंट आहे आणि ती व्यक्ती दुसरी कोणी नसून बॉलिवूडची बार्बी डॉल अभिनेत्री कटरिना कैफ आहे. कटरिना कैफ अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जीचे नाव सलमान खानशी खूप जोडले जाते.

सलमान खान कटरिना कैफची किती काळजी घेतो हे चाहत्यांना वेळोवेळी पाहायला मिळाले आहे. सलमान खानसमोर कटरिना जेंव्हा काही बोलते तेंव्हा सलमान तिचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकतो. बॉलिवूडचा दबंग स्टार सलमाननेही अनेकदा स्टेजवर कटरिना कैफचे जाहीर कौतुक केले आहे. स्वत: सलमान खानने अनेकवेळा कबूल केले आहे की कटरिना कैफ अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जीने आपले करिअर या टप्प्यावर आणण्यासाठी कठोर परिश्रम केले आहेत.

मात्र, सलमान खानला कटरिना किती आवडते, याचा खुलासा खुद्द सलमान खानने एका शोदरम्यान केला होता. कपिल शर्माने सलमान खान आणि कटरिनाला एका शोदरम्यान स्टेजवर बोलावले होते. शोमध्ये कपिलने गमतीने सलमान खानला विचारले होते की, सोशल मीडियावर मुलींचे फोटो पाहण्यासाठी तो झूम इन करतो का?

कपिल शर्माच्या या प्रश्नाला उत्तर देताना सलमान खान उघडपणे म्हणाला होता की, तो इतर कोणत्याही मुलीचा फोटो पाहत नाही, तर (कटरिनाकडे इशारा करत) तिच्या प्रत्येक फोटोवर झूम करतो. मात्र, सलमान खानसोबत उभ्या असलेल्या कटरिना कैफने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

आज जरी कटरिना कैफ विकी कौशलची वधू बनली असली तरी कटरिनाचे सलमान खान आणि त्याच्या कुटुंबाशी खूप जवळचे नाते आहे. त्याच्या संपूर्ण कुटुंबाला कटरिना खूप आवडते. कटरिनाने खान कुटुंबीयांना त्यांच्या लग्नासाठी खास आमंत्रण पाठवले होते. मात्र, द बँग टूरमध्ये व्यस्त असल्याने सलमान खान त्यांच्या लग्नाला उपस्थित राहू शकला नाही.

लग्नानंतर कटरिना लवकरच सलमान खानसोबत टायगर 3 या चित्रपटात दिसणार आहे. कटरिनाने लग्नानंतर चित्रपटातून ब्रेक घेतला होता, पण वृत्तांवर विश्वास ठेवला तर ती लवकरच तिच्या कामावर परतणार आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर सलमान खानने कतरिना आणि विकीला लग्नानंतर रेंज रोव्हर कार गिफ्ट केली आहे.

admin