सैराट मधील ‘बाळ्या’चा नवा रोमँटिक अवतार पाहून ‘ही’ हॉट अभिनेत्री पण पडली प्रेमात.. लवकरच दिसणार सोबत..

सैराट मधील ‘बाळ्या’चा नवा रोमँटिक अवतार पाहून ‘ही’ हॉट अभिनेत्री पण पडली प्रेमात.. लवकरच दिसणार सोबत..

आपल्या मराठी चित्रपट सृष्टीला भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये बहुमानाचे स्थान आहे. त्याचे कारण आहे मराठी चित्रपट सृष्टीला लाभलेले दिग्गज कलाकार. अर्थातच भारतात चित्रपट आणला तो सर्वपरिचित दादासाहेब फाळके या मराठी माणसानेच. त्यांच्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर या दिग्गजांनी ही परंपरा पुढे कायम ठेवली.

परंतु 90 च्या नंतरच्या दशकात मराठी चित्रपट सृष्टी मध्ये पाहिजे तसे सिनेमे बनवले गेले नाहीत. हा काळ चित्रपट सृष्टी साठी अतिशय खडतर होता. मग हळू हळू चित्रपटाची शैली बदलत गेली. नवीन तरुण दिग्दर्शकांना संधी मिळाली. या संधीचं सोनं करत अनेक नवीन प्रतिभावान दिग्दर्शक उदयास आले.

यात अनेक असे दिग्दर्शक आहेत त्यांचा उल्लेख करावा लागेल. रवी जाधव, सतीश राजवाडे, नागराज मंजुळे आणि इतर दिग्दर्शकांचा समावेश आहे. नागराज मंजुळे यांनी तर मराठी चित्रपटसृष्टीला नवीन रेकॉर्ड निर्माण करून दिले. आता तो हिंदीतही चित्रपट निर्मिती करत आहे.

त्यांच्या काही वर्षापूर्वी आलेल्या सैराट या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम निर्माण करत जवळपास शंभर कोटीच्या आसपास गल्ला जमवला होता. या चित्रपटातील परश्या आणि आर्ची या दोन प्रमुख पात्रांची लव्ह स्टोरी आजही तितकीच प्रसिद्ध आहे. पण या दोन पात्रांसह आणखी काही पात्रं देखील होती ज्यांनी लक्षणीय कामगिरी केली होती. त्यापैकीच एक म्हणजे ‘लंगड्या’चं पात्र.

त्यांच्या काही वर्षापूर्वी आलेल्या सैराट या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम निर्माण करत जवळपास शंभर कोटीच्या आसपास गल्ला जमवला होता. या चित्रपटातील परश्या आणि आर्ची या दोन प्रमुख पात्रांची लव्ह स्टोरी आजही तितकीच प्रसिद्ध आहे. पण या दोन पात्रांसह आणखी काही पात्रं देखील होती ज्यांनी लक्षणीय कामगिरी केली होती. त्यापैकीच एक म्हणजे ‘लंगड्या’चं पात्र.

सैराटमधील परश्याचा मित्र लंगड्या याला अजूनही प्रेक्षक विसरले नाहीत. त्याच्या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. त्याच्या या भूमिकेवर प्रेक्षकांनी प्रेमाचा अक्षरशः वर्षाव केला. आता हाच लंगड्या म्हणजेच अभिनेता तानाजी गालगुंडे प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी पुन्हा एकदा सज्ज होणार आहे. झी टॉकीज प्रस्तुत ‘गस्त’ या चित्रपटात तानाजी प्रमुख भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

त्याच्या या नवीन भूमिकेबद्दल बोलताना तानाजी म्हणाला, “मी गस्त या चित्रपटात अमर नावाच्या मुलाची भूमिका साकारतोय. तो एका मुलीच्या प्रेमात आहे आणि ज्या गावात राहतोय त्या गावात पहारा देत असताना त्या मुलीला तो चोरून भेटत असतो. त्यांच्या प्रेमकथा पुढे काय वळण घेते हे प्रेक्षकांना चित्रपटात पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मी एका गावाकडच्या मुलाची भूमिका निभावतोय आणि प्रेक्षकांना देखील ती नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे.

मला थोडंसं दडपण आलं होतं कारण याआधी मी सहायक आणि विनोदी भूमिका केल्या होत्या आणि गस्त मध्ये प्रमुख नायकाची भूमिका असल्यामुळे आधी थोडी धाकधूक होती. प्रेक्षक मला नायक म्हणून कशा प्रकारे प्रतिसाद देतील, तसंच चित्रपटात रोमँटिक नायकाची भूमिका साकारायची यासगळ्याच थोडं टेन्शन होतं. पण आमचे दिग्दर्शक आणि गस्तच्या संपूर्ण टीमने मला खूप सपोर्ट केला त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे.

प्रेक्षकांची लाडकी मराठी चित्रपट वाहिनी – झी टॉकीज ही नेहमीच त्यांच्या मनोरंजनासाठी तत्पर असते. सदाबहार आणि प्रेक्षकांचे आवडते चित्रपट, मनोरंजक कार्यक्रम, धमाकेदार पुरस्कार सोहळे याचसोबत झी टॉकीजने प्रेक्षकांसाठी टॉकीज ओरिजनल चित्रपट देखील सादर केले. गेल्या वर्षी झी टॉकीजने ३ टॉकीज ओरिजनल चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांसाठी सादर केली आणि यावर्षी ही वाहिनी ‘गस्त’ या चित्रपट घेऊन आली आहे.

सैराट नंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांचा लाडका अभिनेता तानाजी गालगुंडे चित्रपटाच्या माध्यमातून त्यांच्या भेटीस येणार आहे म्हणून तमाम प्रेक्षक उत्सुक आहेत. तसेच या चित्रपटात अनेक जबरदस्त कलाकारांची फौज प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

admin