शाहरुखच्या मुलीबाबत नाही राहावले गेले सैफ अली खानच्या पोराला, करून टाकले असले काम

शाहरुखच्या मुलीबाबत नाही राहावले गेले सैफ अली खानच्या पोराला, करून टाकले असले काम

90 च्या काळामध्ये अनेक अभिनेते बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी येत होते. यामध्ये दिल्लीचा एक मुलगा देखील आला होता. त्याचे नाव शाहरुख खान असे होते. शाहरुख खान याला सुरुवातीला बॉलीवूडमध्ये चित्रपटात येण्यासाठी खूप धडपडावे लागले होते. त्याने टीव्ही मालिका मधून आपले काम सुरू केले होते.

फौजी या मालिकेतून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने घरच्यांचा विरोध पत्करून गौरीच्या सोबत लग्न केले. त्यानंतर गौरी खान हिने आत्तापर्यंत शाहरुख याची साथ दिली आहे. त्यानंतर शाहरुख याला बॉलिवूडमध्ये चित्रपट भेटत नव्हते. अशा वेळेस छोट्या-मोठ्या भूमिका करून तो बॉलिवूडमध्ये स्थिरावत होता.

याच वेळेस त्याला दिवाना या चित्रपटाची ऑफर आली. या चित्रपटांमध्ये गाणे अफलातून असे होते. त्याने काम करून बॉलिवूडमध्ये आपले नाव कमावले. या चित्रपटांमध्ये दिव्या भारती आणि ऋषी कपूर यांच्या भूमिका होत्या. दिव्याभारती हिने या चित्रपटातून जबरदस्त असे काम केले होते. मात्र, या चित्रपटानंतर ती अपघाती मृत्यू पावली. तिच्या मृत्यूचे वेगवेगळी कारणे देखील सांगण्यात आले.

शाहरुख खान याला यश चोप्रा कॅम्प मध्ये प्रवेश मिळाला आणि यश चोप्रा यांनी शाहरुखसाठी अनेक चित्रपटाची निर्मिती केली. यामध्ये मोहब्बते, वीर-झारा यासारख्या चित्रपटाचा समावेश आहे. या चोप्रा यांनी त्यांचा शेवटचा चित्रपट वीर-झारा हा केला. 90 च्या कालावधीत बॉलीवूडमध्ये अनेक अभिनेते स्ट्रगल करत होते. यामध्ये सैफ अली खान याचे नाव देखील घ्यावी लागेल.

सैफ अली खान हा पतोडी घराण्याचा वारसदार आहे. कोट्यवधी रुपयांची संपत्ती घेऊन जन्माला आलेला आहे. असे असले तरी बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी तो सरसावलेला होता. त्याची आई म्हणजे शर्मिला टागोर यांनी बॉलिवूडमधील अनेक चित्रपटात काम केले होते. त्यामुळे सैफ अली खान याला बॉलिवूडमध्ये सहज प्रवेश मिळाला. सैफ अली खान याने अमृता सिंहसोबत लग्न केले.

अमृता सिंह सैफपेक्षा वयाने दहा वर्षांनी मोठी होती. तरी देखील त्याने तिच्या सोबत लग्न केले. अमृता सिंहपासून सैफ अली खानला सारा अली खान ही मुलगी आहे. त्याची मुलगी देखील आता बॉलिवूडमध्ये चांगली स्थिरावत आहे. तसा मुलगा देखील बॉलिवूडमध्ये काम करण्यास उत्सुक आहे. मात्र, त्याला सध्या बॉलिवूडमध्ये काम मिळत नसल्याचे सांगण्यात येते. आता दुसरीकडे शाहरुख खान चे मुले देखील मोठे होत आहेत.

शाहरुख खानची मुलगी सुहाना खान ही सोशल मीडियावर खूप ॲक्टिव असते. गेल्या वर्षभरात तिने अनेक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलेल्या आहेत. मात्र, तिला सावळी असल्याने अनेक जण चिडवत असल्याचे दिसत आहे. सुहाना खान हिचा रंग सावळा आहे. त्यामुळे तिला अनेक जण सुनावत असतात. मात्र, असे असताना देखील ती आपल्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असते.

काही दिवसापूर्वी देखील तिला सोशल मीडियावर टार्गेट करण्यात आले होते. त्यावर तिने खुमासदार अशी पोस्ट लिहिली होती. भारतीयांचा कलर ब्राऊन असा आहे. मात्र, जर तुम्ही सावळे असाल तर तुमचा दुजाभाव करणे अतिशय चुकीचे आहे. असे तिने म्हटले होते. तसेच महिलांना सावळे असल्याने त्यांचा अपमान करणे हे अतिशय चुकीची असल्याचे तिचे म्हणणे होते. या तिच्या पोस्टनंतर बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी तिचे समर्थन केले.

तसेच तिला आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, असे देखील सांगितले होते. त्यानंतर सैफ आली खान चा मुलगा देखील सुहाना खान च्या समर्थनात पुढे आलेला आहे. त्याने देखील सुहाना हिचे समर्थन करताना मी तुझ्या कायम सोबत असून तुला काहीही मदत लागली तर सांग, असे म्हटले आहे. सुहाना खान ही पुन्हा चर्चेत आलेली आहे.

आता ती बॉलिवूडमध्ये लवकरच येणार असे देखील सांगण्यात येत आहे. मात्र, ती कधी प्रदार्पण बॉलिवूडमध्ये करते हे तर येणारा काळच ठरवेल.

admin