अमृता सिंगपासून घट-स्फोट घेण्याच्या बदल्यात सैफला इतके कोटी द्यावे लागले, जाणून घ्या का झाले दोघे वेगळे?

अमृता सिंगपासून घट-स्फोट घेण्याच्या बदल्यात सैफला इतके कोटी द्यावे लागले, जाणून घ्या का झाले दोघे वेगळे?

अलीकडेच बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान चौथ्यांदा पिता झाला आहे. त्याला आधीच तीन मुले आहेत. तैमूर अली खान त्यापैकी सर्वात धाकटा होता.

तो सैफची दुसरी पत्नी करीना कपूर खान चा मुलगा आहे, तो ४ वर्षांचा आहे. तैमूरचा जन्म २० डिसेंबर २०१६ रोजी झाला होता, जो जन्मापासूनच चर्चेत राहिला आहे.

आज आम्ही तुम्हाला सैफ अली खानच्या अमृता सिंगसोबत पहिले लग्न आणि नंतर घटस्फोटाची संपूर्ण कथा सांगणार आहोत. अमृता सिंगसोबतचे त्यांचे प्रेमसंबंध आणि गुप्त विवाह पाहून केवळ त्यांच्या चाहत्यांनाच आश्चर्य वाटले नाही तर पुत्र सैफने अमृताशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे पतौडी कुटुंबालाही धक्का बसला होता.

अमृता सैफपेक्षा १२ वर्षांची मोठी होती पण सैफला त्याची पर्वा नव्हती कारण तो तिच्या प्रेमात पडला होता. मग दोघांमध्ये असे काहितरी घडले की ते वेगळे झाले आणि सैफने करीनाशी लग्न केले.

ही मुलाखत वर्ष २००५ ची आहे. या अगोदर एक वर्ष आधी सैफ आणि अमृताचा घटस्फोट झाला. मुलाखतीत सैफ म्हणाला होता की, ‘घ ट स्फो टापासून मी माझ्या मुलांना भेटलो नाही. मला पुन्हा पुन्हा माझ्या स्थितीची आठवण येते. मी वाईट वागणूक, छ ळ सहन केले आहेत. घ ट स्फो टानंतर मला बरं वाटतंय. ‘

पैशांवरून झालेल्या भांडणामुळे आणि सैफच्या एक्स्ट्रा मॅरेटल अफेअरमुळे २००४ मध्ये या दोघांचा घट स्फो ट झाला. काही काळापूर्वी सैफची एक मुलाखत समोर आली होती. या मुलाखतीत त्याने आपल्या आणि अमृताच्या नात्याबद्दल मोकळेपणाने भाष्य केले. तसेच आपली असहायताही व्यक्त केली.

सैफ आणि अमृता सिंग यांची पहिली भेट १९९२ मध्ये झाली होती. त्यावेळी अमृताने बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली होती आणि सैफ ‘बेखुदी’ चित्रपटातून डेब्यू करणार होता.

‘बेखुदी’ चे दिग्दर्शन राहुल रवैल यांनी केले होते. राहुल रवैल हे अमृता सिंग यांचे जवळचे मित्र होते. तर अमृता सिंगने ‘बेखुदी’ चित्रपटाच्या स्टारकास्टबरोबर फोटोशूट करावं अशी त्यांची इच्छा होती. ‘बेखुदी’ चित्रपटाद्वारे सैफ आपला चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत होता, त्यामुळे या फोटोशूट दरम्यान अमृता आणि सैफ पहिल्यांदाच भेटले.

घट स्फो टानंतर अमृताने त्याच्यावर पोटगी न दिल्याचा आरोप केला. यावर सैफ म्हणाला, ‘मला अमृताला ५ कोटी रुपये द्यायचे होते. यापैकी मी अडीच कोटी दिले आहेत. याशिवाय मी दरमहा १ लाख रुपये स्वतंत्रपणे देत आहे.

म्हणजे मुलगा इब्राहिम १८ वर्षांचा होईपर्यंत. मी काही शाहरुख खान नाही. माझ्याकडे इतके पैसे नाहीत. ‘ सैफ पुढे म्हणाला, ‘मी तीला वचन दिले आहे की उर्वरित पैसेही मी देईन. मी माझ्या पत्नीचा आदर करतो. माझ्या पाकिटात मुलगा इब्राहिमचा फोटो आहे. मी त्याचे चित्र पाहिल्यावर रडतो. मला माझ्या मुलांना भेटण्याची परवानगी नाही.

admin