रिंकू राजगुरूला बॉलिवूडमधील या अभिनेत्यासोबत जायचे आहे डेटवर

रिंकू राजगुरूला बॉलिवूडमधील या अभिनेत्यासोबत जायचे आहे डेटवर

सैराट’मधील आर्ची उर्फ रिंकू राजगुरू सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासोबत शेअर करत असते.

तिचे विविध अंदाजातील आणि तिच्या चित्रपटाच्या संबंधीत असलेले फोटो ती यावर पोस्ट करत असते. तिच्या सगळ्याच फोटोंना तिच्या फॅन्सचा भरभरून प्रतिसाद मिळतो. तिने काहीच महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर एंट्री घेतली असली तरी खूपच कमी वेळात तिला सोशल मीडियावर खूपच चांगले फॅन फॉलोव्हिंग आहे.

रिंकूने काही दिवसांपूर्वी कलर्स टिव्हीवरील एकदम कडक या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमाच्या दरम्यान तिला अनेक प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांची तिने दिलखुलासपणे उत्तरं दिली. तुला कोणासोबत डेटवर जायला आवडेल? असे रिंकूला या कार्यक्रमात विचारले असता तिने क्षणाचाही विलंब न लावता तिला विकी कौशलसोबत डेटवर जायला आवडेल असे उत्तर दिले. यावरूनच तिला विकी खूप आवडत असल्याचे तिच्या चाहत्यांना कळले आहे.

रिंकू राजगुरू सोशल मीडियावर केवळ तिचे फोटो अथवा व्हिडिओ पोस्ट करते असे नाही तर ती अनेकवेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्ससोबत गप्पा देखील मारते. तिने इन्स्टाग्रामच्या आस्क मी ॲनिथिंगच्या माध्यमातून तिच्या फॅन्ससोबत काही दिवसांपूर्वी गप्पा मारल्या होत्या.

त्यावेळी तू सिंगल आहेस का? असे एका चाहत्याने रिंकूला विचारले असता हो, मी सिंगल आहे असे रिंकूने उत्तर दिले होते तर तुझा कोणी बॉयफ्रेंड आहे का? असे एका फॅनने तिला विचारले असता माझा कोणीही बॉयफ्रेंड नाही असे तिने सांगितले होते.काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या सैराटमध्ये लक्षवेधी ठरली ती परशा आणि आर्चीची जोडी.

सैराटमध्ये आर्ची साकारणारी रिंकू राजगुरू तर भलतीच भाव खाऊन गेली. तिचा प्रत्येक डायलॉग, तिचं ट्रॅक्टर किंवा बुलेट चालवणं, परशावरील प्रेम असा प्रत्येक अंदाज रसिकांना भावला. त्यामुळेच सैराटमधील आर्ची अवघ्या महाराष्ट्राची लाडकी बनली.

‘सैराट’ सिनेमानंतर रिंकू राजगुरूने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. इतकंच नाही तर ‘सैराट’ या सिनेमासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

admin