जेव्हा या दिग्गज अभिनेत्रीने केले होते रेखा बद्दल असे वक्तव्य.. ‘रेखा आमच्या पुरुषांना चुकीचे इशारे करून’

जेव्हा या दिग्गज अभिनेत्रीने केले होते रेखा बद्दल असे वक्तव्य.. ‘रेखा आमच्या पुरुषांना चुकीचे इशारे करून’

गेली अनेक वर्षे हिंदी चित्रपटसृष्टीत आपला अभिनय, चिरतरुण सौंदर्य आणि मादक तसंच घायाळ करणा-या अदांमुळे रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलेल्या अभिनेत्री म्हणजे रेखा. त्यांच्या अभिनयावर आजही सारेच फिदा आहेत. त्यामुळेच की काय बॉलीवुड दिवा म्हणून त्यांची ओळख आहे.

रेखा यांचं व्यावसायिक जीवन जितकं गाजलं तितकंच त्याचं खासगी जीवन वादग्रस्त ठरलं. त्यातही महानायक आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्यावर असलेलं प्रेम त्या कधीच लपवू शकल्या नाहीत हेही उघड सत्य आहे. बिग बींवर त्यांचं जीवापाड प्रेम होतं आणि किंबहुना आहे. मात्र हे वास्तव त्यांनी आजवर कधीही स्वीकारलं नाही.

‘ दो अनजाने ‘ सिनेमात रेखा अमिताभ यांनी पहिल्यांदाच एकत्र काम केले होते. रसिकांनाही जोडी प्रचंड पसंतीस पात्र ठरली होती. या सिनेमानंतर दोघांमध्ये जवळीक वाढू लागली होती.

निर्माते दिग्दर्शकांनाही रेखा आणि अमिताभ यांनी एकत्र त्यांच्या सिनेमात काम करावे अशी ईच्छा असायची. सुपरहिट ठरलेली जोडी अनेक सिनेमात एकत्र झळकली खरी मात्र जया बच्चन यांना रेखासोबत अमिताभ यांचे काम करणे खटकत होते.

त्यावेळी रेखाची प्रतिमा अशी बनली होती की तिच्यासाठी कोणीही सहज शब्द वापरु शकेल. त्यावेळी रेखासाठी अनेक अश्लील शब्दही बोलले जाऊ लागले होते. तसेच त्या काळातील टॉप अभिनेत्रीला इतर अभिनेत्रींकडूनही कठोर शब्दांचा सामना करावा लागत असे. 1976 मध्ये सुनील दत्तची पत्नी आणि संजय दत्तची आई नर्गिस नेही रेखासाठी अत्यंत घाणेरडे शब्द वापरले होते.

ती म्हणाली होती की, रेखा पुरुषांबद्दल चुकीचे इशारे देत असे. काही लोकांना तर ती अजिबात आवडत नव्हती. नर्गिस पुढे रेखाबद्दल म्हणाली की, बर्‍याच वेळा असे वाटते की मी तिला समजण्यास सुरवात केली आहे. मी आयुष्यात बर्‍याच वेळा मानसिक समस्यां असलेेल्या लोकांसोबत काम केले आहे. ती हरवली आहे. तिला एका मजबुत पुरुषाची गरज आहे…

‘मुक्कदर का सिकंदर’ सिनेमाच्या स्क्रिनिंगवेळी जयाबच्चनही उपस्थित होत्या.सिनेमाचे स्क्रिनिंग सुरु झाले आणि दोघांचाही एक रोमँटीक सीन सुरु झाला.हा सीन पाहून जया बच्चन खूप निराश झाल्या. इतक्या की त्यांना स्वःचे अश्रु रोखणेही कठिण झाले होते. तिथेच त्या ढसाढसा रडू लागल्या.

हा सीन पाहून दिग्दर्शक निर्मांत्यांना रेखा ज्या सिनेमात असेल त्या सिनेमात अमिताभ बच्चन काम करणार नसल्याचे सांगून टाकले. रेखा यांच्याशी अमिताभ यांची जवळीक पाहून जया बच्चनही चिंतेत होत्या. जया आणि अमिताभ बच्चन यांच्या नात्यावरही त्याचा परिणाम होत होता.

वैवाहीक आयुष्यात रेखा यांच्यामुळे समस्या निर्माण होऊ नये म्हणून शेवटी अमिताभ यांनीच कठोर पाऊले उचलत रेखा यांच्यापासून दूर राहणेच पसंत केले. नुकतेच अमिताभ आणि जया बच्चन यांनी त्यांच्या लग्नाचा ४७ वा वाढदिवस साजरा केला होता.

admin