तुम्हाला माहिती आहे का रेखा यांची मुलगी सोनियाबद्दल?, रेखा इतकीच ती देखील आहे सुंदर

तुम्हाला माहिती आहे का रेखा यांची मुलगी सोनियाबद्दल?, रेखा इतकीच ती देखील आहे सुंदर

गेली अनेक वर्षे हिंदी चित्रपटसृष्टीत आपला अभिनय, चिरतरुण सौंदर्य आणि मादक तसंच घायाळ करणाऱ्या अदांमुळे रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेल्या अभिनेत्री म्हणजे रेखा. त्यांच्या अभिनयावर आजही सारेच फिदा आहेत. त्यामुळेच की काय बॉलीवुड दिवा म्हणून त्यांची ओळख आहे.

रेखा यांचे प्रोफेशनल जीवन जितकं गाजलं तितकंच त्याचं खासगी जीवन वादग्रस्त ठरलं. त्यांच्या खासगी जीवनाविषयी कुणालाच फारसं माहित नाही. रेखा यांनी विनोद मेहरा यांच्यासोबत लग्न केले होते.विनोद मेहरा यांनी वयाच्या 45व्या वर्षी जगाचा निरोप घेतला होता. पण त्यांना तिसऱ्या पत्नीपासून दोन मुले आहेत रोहन मेहरा व सोनिया मेहरा.

सोनिया मेहरा खूप सुंदर आहे. फार कमी लोकांना माहित आहे की सोनिया रेखा यांची मुलगी आहे. भलेही रेखा यांनी सोनियाला जन्म दिला नाही पण रेखा यांचा पहिला नवरा विनोद मेहरा यांची सोनिया मुलगी आहे. सोनिया विनोद मेहरा यांच्या तिसऱ्या पत्नीपासूनची मुलगी आहे. सोनिया रेखा यांच्यासारखी सुंदर आहे पण तिच्यासारखे आतापर्यंत चित्रपटात नाव कमवू शकली नाही. सोनिया सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे.

सोनियाचे वडील विनोद मेहरा यांनी तीन लग्न केले होते. त्यातील एक लग्न अभिनेत्री रेखा यांच्यासोबत केले होते. रेखा आणि विनोद मेहरा यांचे प्रेम चित्रपटाच्या सेटवर जुळले होते. त्यानंतर त्या दोघांनी गुपचूप लग्न केले होते. विनोद मेहरा यांचे निधन फार कमी वयात झाले होते. त्यावेळी सोनिया फक्त दोन वर्षांची होती.

वडिलांच्या निधनानंतर सोनिया केन्या व लंडनमध्ये लहानाची मोठी झाली आहे. तिच्या आजी आजोबांनी तिचे पालन पोषण केले होते. जे परदेशात राहत होते.सोनियाने वयाच्या 8व्या वर्षापासून अभिनयाचे धडे गिरवायला सुरूवात केली होती. तिने फार कमी वयात लंडन एकाडमी ऑफ म्युझिक अँड ड्रामेटिक आर्ट्सच्या अॅक्टिंग एग्जामिनेशनमध्ये गोल्ड मेडल मिळवले होते.

सोनिया एक उत्तम डान्सरदेखील आहे. वयाच्या 17व्या वर्षी शिक्षण पूर्ण करून ती भारतात परतली. त्यानंतर तिने अनुपम खेर यांच्या अॅक्टिंग इन्स्टिट्युटमधून तीन महिन्यांचा कोर्स केला. सोनियाने 2007 साली अनुपम खेर यांच्यासोबत व्हिक्टोरिया नंबर 203 सिनेमात काम केले आहे. यात जिमी शेरगिलदेखील मुख्य भूमिकेत होता.

याशिवाय सोनियाने रागिनी एमएमएस चित्रपटातही काम केले आहे. यात तिने तान्या कपूरची भूमिका केली होती. चित्रपटाशिवाय सोनियाने छोट्या पडद्यावरील काही टिव्ही शोज होस्ट केले आहेत. तिने एमटीव्हीसोबत काही शोज जसे की एमटीव्ही ग्राइंड, एमटीव्ही न्यूज आणि एमटीव्ही स्टाइल चेकमध्ये व्हीजे म्हणून झळकली आहे.

admin