फक्त 14 वर्षाची आहे रविना टंडनची मुलगी, दिसते इतर स्टारकिड्स पेक्षाही भारी, पहा तिचे फोटो

फक्त 14 वर्षाची आहे रविना टंडनची मुलगी, दिसते इतर स्टारकिड्स पेक्षाही भारी, पहा तिचे फोटो

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन ही 90 च्या दशकातील एक खूप सुंदर अभिनेत्री आहे. रवीनाने तिच्या काळात बरेच हिट चित्रपट दिले आहेत. सध्या रवीना बॉलीवूड चित्रपटांपासून दूर आहे. रवीनाने 2004 मध्ये अनिल थडानीशी लग्न केले आणि आता सांसारिक आयुष्य जगात आहे.

आजकाल रवीना आपल्या कुटुंबा सोबत राहून चित्रपटांपासून दूर आयुष्य एन्जॉय करते आहे. रवीनाला चार मुली आहेत. त्यातील एक म्हणजे रवीनाची मुलगी राशा टंडन खूप सुंदर आहे जी कि सोशल मीडियावर खूप वायरल होत आहे. आजकाल तर स्टार किड्सचा जमाना आहे.

सुहाना खान, सारा अली खान, खुशी आणि जाह्नवी कपूर या नव्या पिढीतील प्रसिद्ध स्टार किड्स बद्दल सर्वांना माहिती आहे. पण अशी काही स्टार किड्स आहेत जी खूपच सुंदर आणि ग्लॅमरस असूनही चर्चेत येणे पसंत करत नाहीत. अशीच एक स्टार किड अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी आहे.

काही दिवसांपूर्वी जूही चावला आणि पूनम ढिल्लन यांच्या मुलींचे फोटो व्हायरल झाले आहेत. ते व्हायरल झाले असले तरीही, आजकाल प्रत्येकजण स्टार किड्सची झलक मिळवण्यासाठी हताश आहे. रवीनाने 2005 मध्ये मुलगी राशाला जन्म दिला. ती आता 14 वर्षांची आहे आणि ती हुबेहूब आपली आई रवीनासारखीच दिसत आहे.

राशाची उंचीही खूप चांगली आहे आणि दोन ते तीन वर्षांत ती तिच्या आईपेक्षा उंच होईल. 14 वर्षाची राशा खूप गोंडस आहे. रवीना तिच्यावर खूप प्रेम करते आणि बर्‍याचदा सोशल मीडियावर तिच्याबरोबर फोटो किंवा व्हिडिओ शेअर करते. रवीनाने 1990 मध्येच दोन मुली (पूजा आणि छाया टंडन) दत्तक घेतल्या होत्या.

आता या दोन्ही मुलींचे लग्न झाले आहे. त्यानंतर रवीनाने 2004 साली फिल्म डिस्‍ट्रीब्‍यूटर अनिल थडानी यांच्याशी लग्न केले आणि तिने दोन मुलांना जन्म दिला एक म्हणजे मुलगी राशा आणि एक मुलगा रणबीर आहे.

admin