फक्त 14 वर्ष वय होत त्या मुलीचं, ‘रसना गर्ल’ म्हणून फेमस झाली होती, झाला असा शेवट

फक्त 14 वर्ष वय होत त्या मुलीचं, ‘रसना गर्ल’ म्हणून फेमस झाली होती, झाला असा शेवट

तरूणी सचदेव ही एक भारतीय मॉडेल आणि बाल अभिनेत्री होती.14 मे 1998 रोजी मुंबई शहरात जन्म. तिचे वडील हरेश सचदेव उद्योगपती आहेत. गीता सचदेव असे आईचे नाव आहे. तरूणी ने मुंबईतून शिक्षण घेतले. आई मुंबईच्या इस्कॉनमधील राधा गोपीनाथ मंदिरातील धर्माभिमानी मंडळाची सदस्य होती. तरूणीने स्वतः मंदिरातील अनेक उत्सवांच्या अनेक नाटकांमध्येही भाग घेतला होता. तरूणी वयाच्या 5 व्या वर्षी चित्रपटसृष्टीत आली. आणि तीही तिच्या काळातील सर्वाधिक कमाई करणारी बाल कलाकार ठरली होती. पुढे जाण्यापूर्वी, तिची एक रसना वाली ऍड आठवा ज्यामुळे ही तरूणी इतकी प्रसिद्ध झाली आहे.

तरूणी ने रसना, कोलगेट, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स मोबाइल, एलजी, कॉफी बाइट, गोल्ड विनर, शक्ती मसाला यासारख्या उत्पादनांसाठी अनेक दूरदर्शन ऍड मध्ये काम केले आहे.तिला उद्योगातील सर्वात व्यस्त बाल मॉडेल मानले जात असे. बालकलाकार तरूणी स्टार प्लसचा शो ‘क्या आप पाचवी पास से तेज है?‘ या स्पर्धेतही स्पर्धक होती. त्यावेळी शाहरुख खान हा शो होस्ट करत असे. त्यांनी 2004 मध्ये मल्याळम चित्रपटातून “वेल्लीनक्षत्रम” मधून डेब्यू करत तिने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली.

14 मे 2012 तरुणी ने अचानक जग सोडले. नेपाळच्या अग्नि एअर फ्लाइटचा सीएचटी विमान अपघातात तिचा मृत्यू झाला. ती तिची आई गीता सचदेव दोघी सोबत प्रवास करत होत्या, तिचे आणि तरुणी चे सोबत निधन झाले.त्या दिवशी तरूणीचा 14 वा वाढदिवस होता, सोमवारी पश्चिम नेपाळमध्ये 20 आसनी विमान कोसळले. विमानात 16 भारतीय, 2 डॅनिश रहिवासी आणि तीन चालकाचे असे दल होते.ज्यामध्ये 13 प्रवासी आणि दोन क्रू मेंबर्स मरण पावले. सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला व विमानाचे अक्षरशः तुकडे झाले. त्या अपघातात 15 लोक ठार झाले, सहा प्रवासी बचावले.

11 मे 2012 रोजी तरूणी नेपाळला जात होती. जाण्यापूर्वी तिने आपल्या सर्व मित्रांना मिठी मारली. ती म्हणाली – ‘मी तुम्हा सर्वांना शेवटच्या वेळी भेटत आहे.’ तथापि, हा एक विनोद होता.तिच्या मित्रांनी सांगितले की तरुणीने यापूर्वी कधीही त्यांना मिठी मारली नव्हती. किंवा कोणत्याही सहलीवर जाण्यापूर्वी तिने कधीच निरोप घेतला नाही.

शेवटच्या वेळी तिने विनोदपूर्वक तिच्या मित्राला सांगितले की उड्डाण दरम्यान विमान क्रॅश झाले तर…. त्यानंतर ति आपल्या मित्रांना ‘आय लव यू’ म्हणत निघाली.तिच्या मित्रांचा असा विश्वास होता की त्या विमानातून तीचे निघून जाणे तिच्या नशिबात लिहिले गेले होते. तरुणी या ट्रिप मधून परत कधीच आली नाही. तरूणी च्या अचानक जाण्यामुळे फिल्म इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला. फिल्म इंडस्ट्रीतील लोकांच्या म्हणण्यानुसार, तरूणी एक चांगली अभिनेत्री होतीच आणि एक अतिशय हुशार विद्यार्थी देखील होती. तिच्या जाण्याने अनेक कलाकारांनी हळहळ व्यक्त केली होती.

admin