“माझ्या वडिलांनीच मला बि किनी घालण्याचा सल्ला दिला” ह्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा..

“माझ्या वडिलांनीच मला बि किनी घालण्याचा सल्ला दिला” ह्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा..

बॉलीवूड आणि दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टी मध्ये रकुल प्रीत सिंह हे सर्व परिचित असे नाव आहे. साउथ इंडस्ट्रीमधून बॉलिवूडमध्ये अभिनयाच्या जोरावर खास स्थान मिळवलेल्या रकुल प्रीत सिंग आपल्या मस्त स्टाईलसाठी ओळखली जाते. रकुल प्रीतसिंग हिने २०११ साली झालेल्या पिजंट स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी बि किनी घालणे आवश्यक आहे.

रकुल प्रीत सिंह ही बि किनी घालण्यासाठी तयार नव्हती, पण तिच्या पालकांचा विषेशत: तिच्या वडिलांचा त्यांच्या मुलीवर पूर्ण विश्वास होता. याबाबत नुकताच रकुलने एका मुलाखतीत खुलासा केला आहे. रकुल म्हणाली, ‘माझ्या वडिलांचा माझ्यावर खूप विश्वास होता. खरं तर त्यांनीच मला प्रोत्साहित केले आणि सांगितले की त्यांना खात्री आहे की मी हे करू शकते. कोणाला विश्वास बसणार नाही इतका पाठिंबा मला माझ्या कुटुंबाकडून मिळाला आहे. या बाबतीत मी खूप भाग्यवान आहे.”

रकुल पुढे म्हणाली, ‘मला नेहमीच माझ्या पालकांचा पाठिंबा मिळाला आहे. माझ्या वडिलांना मी बिकिनी घालण्यात कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही. माझे वडील नेहमी मला भडक रंगाची बिकिनी खरेदी करण्याचा सल्ला देतात. माझे पालक सुरुवातीपासूनच खुल्या विचारांचे पालक आहेत, जी माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट होती.” रकुल सध्या तिचे पालक कुलविंदर सिंग आणि राजेंद्र यांच्याकडे राहत आहे.

लॉकडाऊनमध्ये ती आपल्या घराभोवती झोपडपट्टीत राहणाऱ्या 200 कुटुंबांना मदत करत आहे. तिने सांगितले की ती आपल्या वतीने लोकांना मदत करण्यासाठी एक छोटासा प्रयत्न करीत आहे. रकुलच्या म्हणण्यानुसार, लॉकडाऊन वाढल्यास ती पुढेही ही मदत सुरू ठेवेल. अनेकांकडून तिच्या ह्या कामाची खूप वाहवा होत आहे.

रकुल प्रीत सिंह नुकतीच बॉलिवूडच्या दे दे प्यार दे चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात रकुल सोबत आणखी तब्बू आणि अजय देवगण मुख्य भूमिकेत होते. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. हा चित्रपट मागील वर्षी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. रकुल प्रीतने अय्यारी आणि यारियां या बॉलिवूड चित्रपटांव्यतिरिक्त अनेक दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये काम केले आहे.

अभिनेत्री रकुल प्रीत ने एका मुलाखतीत हिंट दिली आहे की दे दे प्यार दे या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांसमोर येऊ शकतो. रकुल ने सांगितले की चित्रपटाच्या सिक्वेलची विचार करूनच क्लाय-मॅक्स लिखाण केले गेले होते.

याव्यतिरिक्त रकुल लवकरच जॉन अब्राहम आणि जॅकलीन सोबत अटॅक या चित्रपटामध्ये सुद्धा दिसणार आहे. हा एक ॲक्शन पट आहे. तसेच ती अर्जुन कपूर सोबत सुद्धा एक चित्रपट करत आहे मात्र या चित्रपटाचे नाव अजून समोर आलेले नाही.

admin