राखी सावंत म्हणतेय, जावेद अख्तर यांना तीचा बायोपिक बनवायचा आहे, आलिया साकारणार राखीची भूमिका??

राखी सावंत म्हणतेय, जावेद अख्तर यांना तीचा बायोपिक बनवायचा आहे, आलिया साकारणार राखीची भूमिका??

‘बिग बॉस 14’ या शोमध्ये दिसणारी राखी सावंत दावा करत आहे की गीतकार जावेद अख्तरला तिच्या आयुष्यावर चित्रपट बनवायचा आहे. तीने एका वृत्तवाहिनीला सांगितले

“सुमारे एक वर्षापूर्वी मला जावेद अख्तर जींचा फोन आला. मला बायोपिक लिहायचा आहे असे त्यांनी सांगितले. त्यांनी मला भेटायला बोलावले. पण मी त्यांना भेटू शकले नाही. ते माझा बायोपिक बनवतील”. पण तो खूप वादग्रस्त असेल आणि मला माहित नाही की देशातील लोकांना ते पहायला आवडेल की नाही?”

इंडिया टीव्हीशी झालेल्या संभाषणात जेव्हा राखीला त्यांच्या भूमिकेत कोण फिट आहे असे विचारले असता तिने आलिया भट्ट चे नाव घेतले. राखी म्हणाली, “मला माहित नाही की ते मला किंवा आलिया किंवा प्रियांका चोप्रा यांना कास्ट करतील का?

मला स्वत: वर खूप प्रेम आहे. जर मला नाही जमले तर आलिया किंवा दीपिका पादुकोण, करिना कपूर सारखे कोणी केले तरी चालेल कारण ह्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहेत, सर्व अभिनेत्री माझ्या आवडत्या आहेत. ” राखी म्हणाली की फरहान अख्तर तिची बायोपिक डायरेक्ट करू शकतो.

याबाबत जावेद अख्तरकडे प्रतिक्रिया मागितली असता त्यांनी राखीची भेट घेतल्याचे कबूल केले. जावेद अख्तर ह्यांनीही कबूल केले की आपण राखीला तिच्या आयुष्यावर स्क्रिप्ट लिहिणार असल्याचे सांगितले होते.

अख्तर ह्यांच्या म्हणण्यानुसार सुमारे 4–5 वर्षांपूर्वी त्यांनी राखीची एका विमानात भेट घेतली. तिथे राखीने त्यांना आपल्या बालपणाबद्दल सांगितले. त्यानंतर त्यांनी राखीबरोबर आयुष्यावर स्क्रिप्ट लिहिण्याची इच्छा व्यक्त केली.

‘बिग बॉस 14’ ची अंतिम फेरी गाठणारी राखी सावंत आजकाल कर्करोगाशी झुंज देणारी आई जया सावंत यांच्या देखरेखीखाली व्यस्त आहे. जयाची केमोथेरपी मुंबईतील रूग्णालयात सुरू आहे. या कठीण काळात सलमान खान, सोहेल खान, बॉबी देओल, कविता कौशिक, विंदू दारा सिंग, कश्मीरा शाह आणि संभवना सेठ सारख्या अनेक सेलिब्रिटी राखीसोबत उभ्या राहिल्या आहेत.

राखीने अलीकडेच सांगितले की, तिच्या आईवर उपचार करणारी डॉक्टर ही सलमान खानच्या ओळखींपैकी एक आहे. तिने रुग्णालयातून आईचे काही फोटो शेअर केले आणि सोशल मीडियावर लिहिले की, “कृपया माझ्या आईसाठी प्रार्थना करा, तिच्यावर कॅन्सर उपचार सुरू आहेत.”

admin