बोलता बोलता अनिल कपूरने उघड केले गुपित, या कारणामुळे शिल्पा शेट्टीने राज कुंद्राशी लग्न केले आहे, व्हिडिओ झाला व्हायरल….

बोलता बोलता अनिल कपूरने उघड केले गुपित, या कारणामुळे शिल्पा शेट्टीने राज कुंद्राशी लग्न केले आहे, व्हिडिओ झाला व्हायरल….

हिंदी चित्रपटसृष्टीतील अतिशय फिट आणि हिट अभिनेत्री शिल्पा शेट्टी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून ती पती राज कुंद्रामुळे चर्चेत होती, तर आता पुन्हा एकदा ती राजमुळे प्रसिद्धीमद्ये आली आहे. वास्तविक, तिला राज कुंद्राशी लग्न करण्याचे कारण विचारण्यात आले आहे, व तिचा एक व्हिडिओ पुन्हा चर्चेत आला आहे.

वास्तविक, राजशी संबंधित एक अतिशय मजेशीर प्रश्न शिल्पासमोर आला होता. सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये अनिल कपूर, शिल्पा शेट्टी आणि फराह खान दिसत आहेत. एकदा अनिल कपूर आणि शिल्पा फराह खानच्या शो बॅकबेंचरमध्ये पाहुणे म्हणून पोहोचले होते.

यावेळी फराह खानने शिल्पाला या शोमध्ये एक मजेदार प्रश्न विचारला होता. त्याने अभिनेत्रीला विचारले होते की, “शिल्पा राजने काय शिट्टी वाजवली होती काय ? पंख पसरवले होते का? म्हणूून तूू त्याच्याशी लग्न करण्यासाठी तयार झालीस?” शिल्पा या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वीच अनिल कपूरने एक मजेशीर उत्तर दिले ज्यावर सगळेचं हसले.

शिल्पा काही बोलायच्या आधीच अनिल म्हणाला, “खरं तर त्याने पैसे घेऊन पसरवले होते.” यावर शिल्पा मोठ्याने हसते आणि ती म्हणते, ‘पैशांच्या व्यतिरिक्त त्याने आपले हातही पसरवले होते.’ पुढे, अनिलची मजेशीर शैली पुन्हा दिसते आणि तो म्हणतो की, “हातातही पैसे होते.”

फराह खानने अनिल कपूरला पुढे प्रश्न विचारला की, ‘ तुमच्याकडे तर पैसेही नव्हते, तर सुनीता (अनिल कपूरची पत्नी) कशी पटली?’ यावर फराहला उत्तर मिळते, ‘कारण सुनीताकडे पैसे होते.’ अनिल आणि सगळे जोरजोरात हसायला लागतात. हा व्हिडीओ जुना असला तरी सोशल मीडियावर चाहत्यांना तो खूप आवडला आहे.

राज कुंद्राने दोनदा लग्न केले आहे. त्याने शिल्पासाठी पहिले लग्न मोडले. शिल्पा आणि राज लग्नाआधी एकमेकांना डेट करत होते. दोघांची पहिली भेट लंडनमध्ये झाली. शिल्पासाठी राजने आपल्या पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला होता, त्यानंतर 2009 मध्ये राज आणि शिल्पाने लग्नगाठ बांधली.

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांची गणना बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांमध्ये केली जाते. दोघेही दोन मुलांचे पालक आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी. मुलाचे नाव विआन आहे जो मोठा आहे तर, मुलीचे नाव समिशा आहे. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, शिल्पाचा शेवटचा चित्रपट ‘हंगामा 2’ होता जो या वर्षी जुलैमध्ये प्रदर्शित झाला होता आणि तो फ्लॉप ठरला होता.

admin