आश्चर्यकारक…. अभिनेत्री राधिका आपटे ने चक्क या कारणासाठी केले विदेशी पुरुषाशी लग्न….

आश्चर्यकारक…. अभिनेत्री राधिका आपटे ने चक्क या कारणासाठी केले विदेशी पुरुषाशी लग्न….

‘शोर इन द सिटी’, ‘अंधाधुन’ आणि ‘पॅडमॅन’ सारख्या चित्रपटांमध्ये आणि ‘लस्ट स्टोरीज ‘सेक्रेड गेम्स’ आणि ‘घोल’ सारख्या वेबसीरीज़मध्ये राधिका आपटेने आपली निर्दोष अभिनय,कौशल्य आणि मस्त जीवनशैली दाखविली आहे.

राधिका आपटेने तिच्या लग्नाबद्दल मोठे विधान केले आहे. राधिका म्हणाली की तिने सहजपणे व्हिसा मिळावा म्हणून तिने ब्रिटिश संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी लग्न केले. यासोबतच तिने असेही म्हटले आहे की,लग्नाच्या परंपरेवर तिचा विश्वास नाही.

खरं तर, सध्या लंडनमध्ये तिच्या पतीसोबत असलेल्या राधिकाने नुकताच अभिनेता विक्रांत मस्सीसोबत थेट व्हिडिओ चॅट केला होता. या दरम्यान दोघांनीही एकमेकांना अनेक प्रश्न विचारले.

मला लग्नाच्या संस्थेवर विश्वास नाही – जेव्हा विक्रांतने राधिका आपटेला विचारले की तुम्ही लग्न कधी केले? म्हणून हसून राधिका म्हणाली, “जेव्हा मला हे समजले की लग्न केल्यामुळे व्हिसा मिळवणे सोपे होते.” माझ्या मते लग्नामधे कोणत्याही सीमा असू नयेत.

मी विवाहाशी समर्थक नाही किंवा मला या संस्थेवर विश्वास नाही पण व्हिसा ही मोठी समस्या असल्याने मी लग्न केले होते आणि आम्हाला एकत्र राहायचे होते,म्हणून मी लग्न केले.’

अत्यंत हुशार अभिनेत्री समजल्या जाणार्‍या राधिका आपटेने 2012 साली लंडनच्या संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी लग्न केले. लग्नाआधी दोघेही लॉन्ग डिस्टेन्स रिलेशनशिप मधे होते. राधिकाच्या लग्नाची बातमी सर्वत्रच आली आणि या बातम्यांमुळे तिच्या चाहत्यांनाही आश्चर्य वाटले.मात्र, अनेक वेळा राधिकालाही प्रश्न विचारण्यात आले आहेत की तिने लॉन्ग डिस्टेंस लग्न का केले? पण त्यानंतर राधिकाने यासाठी कोणतेही कारण दिले नाही.

लंडनमध्ये दोघांचे गुपचूप लग्न झाले होते – राधिका 2011 मध्ये बेनिडिक्टला भेटली तेव्हा राधिका कंटेम्परेरी नृत्य शिकण्यासाठी लंडनला गेली होती. वर्षभराच्या डेटिंगनंतर या दोघांनी रजिस्टर्ड मैरेज केले होते. दोघांनी लंडनमध्ये गुपचूप लग्न केले होते आणि 2013 मध्ये राधिकाने हे लग्न उघडकीस आणले होते.तथापि, ते क्वचितच एकत्र दिसतात.

राधिका सध्या लंडनमध्ये आहे – राधिका सध्या आपल्या पतीसमवेत लंडनमध्ये आहे आणि आयुष्याचा आनंद घेत आहे.यावर्षी ती काम करणार नाही,असा निर्णय तिनी घेतला आहे.

राधिका तिच्या उत्कृष्ट अभिनय आणि ऑफ द शेल्फ चित्रपटांसाठी ओळखली जाते. तिच्या लोकप्रिय प्रोजेक्ट्स मध्येें ‘लस्ट स्टोरीज’, ‘घोल’, ‘सेक्रेड गेम्स’, ‘अंधाधुन’ इत्यादींचा समावेश आहे. इतकेच नाही तर फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित झालेल्या तिच्या ‘पार्च्ड’ चित्रपटाच्या काही बोल्ड सीन्समुळे तीही चर्चेत आली होती. तिच्या उत्कृष्ट अभिनयाशिवाय ती देखील कॉन्ट्रोवर्सीयल चर्चेत राहिली आहे. विशेषत: जेव्हा राधिकाने तिच्या कास्टिंग काउचच्या गोष्टी शेअर केल्या तेव्हा तिने एका नव्या वादाला जन्म दिला.

admin