या’ अभिनेत्रीचा ‘खळबळजनक’ खुलासा ! म्हणाली – ‘महिलाच नव्हे तर …

या’ अभिनेत्रीचा ‘खळबळजनक’ खुलासा ! म्हणाली – ‘महिलाच नव्हे तर …

फिल्म इंडस्ट्रीच्या डार्क साईडबद्दल आजवर अनेक कलाकारांनी खास करून अभिनेत्रींनी अनेक खुलासे केले आहेत. बॉलिवूड स्टार राधिका आपटे हिनंही काही धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत.

अभिनेत्री नेहा धुपियाच्या टॉक शोमध्ये बोलताना राधिका आपटे म्हणाली, “इथं कोणीच सरक्षित नाहीये. हे स्थान सर्वांसाठीच धोकादायक आहे. कारण इथं केवळ महिलाच नाही तर पुरुष कलाकारांचही लैं-गि-क शोषण केलं जातं.”

एका इंग्रजी वृत्तानुसार, राधिका आपटे म्हणाली, “इंडस्ट्रीमध्ये शारीरिक शोषणाला ब-ळी पडलेल्या काही अभिनेत्यांची नावंही मला माहिती आहेत. ही लोक समोर यासाठी येत नाहीयेत कारण त्यांच्या बोलण्यावर कोणी विश्वासच ठेवणार नाही.”

राधिका पुढे म्हणाली, “कामाच्या ठिकाणी असे अत्याचार होऊ नये यासाठी लैं-गि-क हिं-सा प्रतिबंधक समिती असणं अनिवार्य आहे. जर कोणावर अ-त्या-चा-र होत असेल तर अशा स्त्री किंवा पुरुषानं आवाज उठवणं गरजेचं आहे.”

लैं-गि-क छ-ळाच्या आरोपाखाली परराष्ट्र राज्यमंत्री एम जे अकबर यांच्या राजीनाम्यासंबंधित प्रश्नावर बोलताना राधिका आपटे म्हणते, “असे अनेक लोक आहेत जे अशा गोष्टींमध्ये सामिल आहेत. अनेक लोक समोर येणं बाकी आहे. सध्या आम्ही अशा स्थितीत आहोत की, त्या व्यक्तींबद्दल काहीही बोलू शकत नाही.

admin