जॅकलिनने खरेदी केले प्रियांकाचे जुने घर? किंमत वाचून व्हाल थक्क

जॅकलिनने खरेदी केले प्रियांकाचे जुने घर? किंमत वाचून व्हाल थक्क

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस घायाळ करणारं सौंदर्य, कुणाच्याही काळजाचा ठाव घेतील अशा मादक अदा आणि अभिनय यामुळे अल्पावधीतच हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत तिनेही आपले स्थान मिळवलं आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील बड्या बॅनर्सचे सिनेमा जॅकलिनकडे आहेत.

बडे दिग्दर्शक जॅकलिनला सिनेमात घेण्यासाठी उत्सुक असतात. सिनेमांसोबतच मॉडेलिंग आणि जाहिरातींच्या माध्यमातून जॅकलिन कोट्यवधी रुपये कमावते. मुंबईत स्वतःचे हक्काचे घर असावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. तसंच स्वप्न कोट्यवधीची मालकीण असणाऱ्या जॅकलिनचं असावं. त्यामुळंच तिने मुंबईत स्वतःचं घर खरेदी केल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

मात्र याबाबत जॅकलिन अधिकृतरित्या कोणतीही माहिती दिलेली नाही. जॅकलिन तिच्या नव्या घरात शिफ्ट झाली आहे. तिने बॉलिवूडची पिग्गी चॉप्स प्रियांका चोप्राचे जूहूमधील घर खरेदी केल्याची माहितीस समोर येत आहे.

२०१८मध्ये प्रियंकाने तो फ्लॅट खरेदी केला होता. त्यानंतर प्रियांका काही दिवस तेथे राहली.लग्नानंतर मात्र प्रियांका लॉस एंजेलिसमध्ये स्थायिक झाली. प्रियंकाने तिचा हा फ्लॅट जॅकलिनला तब्बल ७ कोटींमध्ये विकला आहे.

गेल्या ७ वर्षापासून ती भाड्याच्या घरात राहत होते. जॅकलिनकडे तिचं हक्काचं घर नव्हतं. वांद्र येथे ती भाड्याच्या घरात राहत होती त्यासाठी लाखो रुपये भाडे ती अदा करत होती. आता तिने प्रियांकाचे घर खरेदी केल्यामुळे तिच्या स्वप्नातील आशियाना खरेदी करण्याचे स्वप्न तिने पूर्ण केले आहे.

जॅकलिन ही मुळची श्रीलंकेची आहे.जॅकलिन तिच्या अभिनयापेक्षा तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते. तिच्या ग्लॅमरस अदा, बोल्ड लूक यामुळे भारतामध्ये तिचे अनेक चाहते आहेत. तिने आपल्या चित्रपट करिअरची सुरुवात २००९ मध्ये ‘अलादीन’ पासून केली होती.

यात तिच्या सोबत रितेश देशमुख आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत होते. त्यानंतर ‘मर्डर 2’ मध्ये इमरान हाशमीसोबत दिसली होती. जॅकलिन आज बॉलिवूडवर राज्य करत आहे.

admin