एका बड्या दिग्दर्शकाने दिली होती अशी ऑफर.. चित्रपट हवे असतील तर आधी ब्रे-स्ट वाढवून देतो.. प्रियांका चोप्राचा खुलासा..

एका बड्या दिग्दर्शकाने दिली होती अशी ऑफर.. चित्रपट हवे असतील तर आधी ब्रे-स्ट वाढवून देतो.. प्रियांका चोप्राचा खुलासा..

बॉलिवूड नावाने ओळखली जाणारी आपली भारतीय हिंदी फिल्म इंडस्ट्री सामान्य माणसाला कायमच हवीहवीशी वाटते. पण या इंडस्ट्री मध्ये अशा अनेक घटना घडत असतात ज्यांची आपल्याला कल्पना देखील नसते. तिचे खर रूप आपल्याला माहीत नसते. पण त्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत असलेल्या लोकांना मात्र त्या इंडस्ट्रीतील सगळ्या गोष्टी माहिती असतात.

बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री मध्ये नाव कमावण्यासाठी कलाकारांना भरपूर मेहनत घ्यावी लागते. परंतु गोष्ट जेव्हा अभिनेत्रीं बद्दल असते तेव्हा त्यांना आपले अभिनय कौशल्य तर दाखवावेत लागते पण त्यासोबतच असे म्हणतात अभिनेत्रींना फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यात फिल्म इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग कावूचसारख्या गोष्टी घडत असतात.

ही इंडस्ट्री इतकी मोठी आणि अवाढव्य आहे की या मध्ये हरॅसमेंट आणि कास्टिंग काउचचे अनेक प्रकार रोज समोर येत असतात. याचे कारण आहे रोज लाखो तरुण तरुण्या या चंदेरी दुनियेची स्वप्न घेऊन या इंडस्ट्री मध्ये येतात पण सगळ्यांनाच संधी मिळतेच असे नाही.

मग अशा वेळेस छोटा मोठा का होईना परंतु आपल्याला काहीतरी काम मिळावं या हव्यासापोटी अनेक अभिनेत्र्या अशा प्रकारचं कोंप्रोमाईज करायला तयार होतात. त्यांची इच्छा असो व नसो पण या ग्लॅमर च्या दुनियेत टिकून राहण्यासाठी अशी पाऊले उचलली जातात पण त्यावर खुप कमी लोक बोलत असतात.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिच्या ‘अनफिनिश्ड’ या आत्मचरित्रामुळे चर्चेत आहे. तिचे हे पुस्तक 9 फेब्रुवारीला लाँच झाले आहे. या पुस्तकात प्रियांकाने आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाशी संबंधित अनेक खुलासे केले आहेत. या पुस्तकात तिने एका बड्या निर्माता-दिग्दर्शकाचा उल्लेख केला आहे, ज्याला ती करिअरची सुरुवातीला भेटली होती. त्या दिग्दर्शकाने प्रियांकाला ब्रे-स्टसह शरीराच्या तीन अंगाची श-स्त्र-क्रिया करण्याचा सल्ला दिला होता.

प्रियांकाच्या म्हणण्यानुसार, 2000 मध्ये मिस वर्ल्डचे विजेतेपद मिळाल्यानंतर जेव्हा ती अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवणार होती तेव्हा ही घटना घडली होती. अभिनेत्रीने लिहिले की, “काही मिनिटांच्या भेटीदरम्यान त्या दिग्दर्शक / निर्मात्याने मला उभे राहण्यास सांगितले. मी त्याने सांगितले तसे केले. तो बराच वेळ माझ्याकडे टक लावू बघत राहिला आणि नंतर त्याने मला माझ्या ब्रे-स्ट, जबडा बटची स-र्जरी करायला हवी, असे म्हटले.”

जर मला अभिनेत्री व्हायचे असेल तर मला माझ्या शरीरात बदल करायला हवा. लॉस एंजेलिसमध्ये तो एका चांगल्या डॉक्टराला ओळखतो आणि तो मला तिथे पाठवू शकतो, असे त्या दिग्दर्शकाने मला म्हटले होते,’ असे प्रियांकाने सांगितले. तुमची ब्रे-स्ट मी वाढवून देतो असेही त्याने म्हटले.

यापूर्वी प्रियांका याबद्दल कधीच का बोलली नाही? याचे कारण प्रियांकाने एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. प्रियांकाच्या म्हणण्यानुसार ती मनोरंजन क्षेत्रात काम करते आणि इथे मजबूत असणे आवश्यक आहे. एखादा कलाकार कमकुवत झाला तर लोक त्याला मान देत नाही. या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत ती आपले काम करत राहिली, असे तिने सांगितले.

admin