सलमानची हिरोइन पुन्हा आर्थिक अडचणीत, दोन वेळेचे जेवणासाठीही नाही तिच्याकडे पैसे

सलमानची हिरोइन पुन्हा आर्थिक अडचणीत, दोन वेळेचे जेवणासाठीही नाही तिच्याकडे पैसे

अभिनेत्री पूजा डडवाल अलीकडच् चर्चेत होती टीबीचा आजार होता. तिची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट झाली होती की तिला तिच्या उपचाराचा खर्चही परवडत नव्हता. दोन वेळचे अन्नासाठीही तिच्याकडे पैसे नव्हते म्हणून सलमान खानची मदत घेतली होती. सलमाननेही तिचा उपचाराचा सगळा खर्च उचलला होता.

आजारपणातून सावरल्यानंतर दोन पैसे कमावता यावे म्हणून तिने टिफिन सर्विसही सुरू केली होती. एकेकाळी बॉलिवूडच्या रंगीबेरंगी दुनियेत आयुष्य जगणारी पूजाची अवस्था आज खूपच बिकट झाली आहे. सलमान खानबरोबर पूजाने ‘वीरगती ’ या सिनेमात काम केले होते. ‘वीरगती’ सिनेमानंतर ‘हिंदुस्तान’ आणि ‘सिंदूर की सौगंध’ सारख्या सिनेमातही तिने काम केले आहे.

पण त्यानंतर ती अचानक सिनेमांतून गायबच झाली. सिनेमाच्या ऑफर्स मिळणे बंद झाले. अशा परिस्थितीत पूजा अनेक वर्षांपासून गोव्यात कॅसिनोमध्ये काम करत होती. आता पुन्हा पूजाची परिस्थिती खालावली असल्याची चर्चा आहे. कारण मध्यंतरी पूजालाही कोरोनाची लागण झाली होती.

थंडी, खोकला, श्वास घेण्यात अडचण, अशक्तपणा, घशात वेदना आणि कोणत्याही प्रकारच्या अन्नाची चव नसल्यामुळे जेवण न जाणे अशी लक्षणं तिच्यात आढळून आली होती. त्याच वेळी दुसरी अडचण तिच्याकडे उपचारासाठी पैसे नव्हते. त्यामुळे पुन्हा सह-अभिनेता अभिनेता सलमान खानकडे मदत मागिती होती.

जेव्हा जेव्हा तिला मदतीची गरज असते तेव्हा तिला सलमानच मदत करतो. त्यामुळे आज पूजासाठी सलमान हा देवाप्रमाणेच आहे. देवापेक्षा सलमान कमी नसल्याचे ती मानते. जेव्हा कधी मी माझ्या घरात मंदिर बनवले तेव्हा सलमानचाच फोटो ठेवून त्याची पूजा करेन. पडत्या काळात सलमानने खूप मदत केली आहे. आजही पूजाचा जगण्यासाठी संघर्ष सुरु आहे.

इंडस्ट्रीमध्ये तिला काम देणारेही कोणी नाही. दैनंदिन गरजेच्या वस्तू घेण्यासाठीही पैसे शिल्लक नाहीत. या अभिनेत्रीला काम मिळत नसल्याने इतरांकडून मदत मागण्यापलिकडे पर्याय राहिला नसल्याचं चित्र सध्या तरी पाहायला मिळतंय.

admin