बॉलिवूडमधील संघर्षाचे दिवस आठवून ढसाढसा रडली ही प्रसिद्ध अभिनेत्री, म्हणाली “हॉटेल मध्ये ऑडिशनला बोलवून..

बॉलिवूडमधील संघर्षाचे दिवस आठवून ढसाढसा रडली ही प्रसिद्ध अभिनेत्री, म्हणाली “हॉटेल मध्ये ऑडिशनला बोलवून..

बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करण्यासाठी डान्सिंग क्वीन नोरा फतेहीला खूप संघर्ष करावा लागला. नोराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत नोरा स्ट्रगलच्या दिवसांबद्दल बोलताना खूप इमोशनल झालेली दिसतेय.

नोरा म्हणाली, त्यावेळी तिला हिंदी बोलता येत नव्हते म्हणून ऑडिशन दरम्यान तिला कास्टिंग जाणूनबूजून हिंदीत लिहिल्या स्क्रिप्ट द्यायचे. जेणेकरुन माझ्यासमोरच माझी खिल्ली उडवता येईल. मुलाखतीदरम्यान नोरा पुढे म्हणाली की, ही वागणूक पाहून तिला खूप राग यायचा, हे सर्व सांगताना नोराला तिचे रडू अनावर झाले.

नोरा फतेहीने कधी वेटरचे काम केले आहे तर कधी पोट भरण्यासाठी नोरावर लॉटरी विकण्याची वेळही आली होती. स्ट्रगलिंगच्या दिवसांत ती PG म्हणून राहायची. नोरा आपल्या डान्स आणि फोटोंमुळे आकर्षणाचं केंद्रबिंदू असते. सोशल मीडियावर सतत अ‍ॅक्टिव्ह असते.

नोरा फतेहीचा जन्म ६ फेब्रुवारी, १९९२ साली कनाडामध्ये झाला होता. नोरा फतेहीने २०१४मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर टीव्ही रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस ९’ मध्ये तिला प्रसिद्धी मिळाली. अभिनेत्री नोरा फतेहीची ‘दिलबर’, ‘कमरिया’, ‘साकी साकी’, ‘एक तो कम जिंदगी’ आणि ‘गर्मी सॉन्ग’ ही गाणी फारच गाजली.

अजूनही तिची ही गाणी खासकरून तिच्या अफलातून डान्ससाठी पाहिली जातात. नोरा फतेहीने तिच्या करिअरची सुरूवात चित्रपट रोर टायगर्स ऑफ द सुंदरबन्समधून केली होती. नोरा अजय देवगनसोबत ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ मध्ये दिसणार आहे. नोरा फतेहीला इन्स्टाग्रामवर 22.5 मिलियन फॉलोवर्स आहेत.

admin