रणबीर कपूरच्या अभिनेत्रीचा खुलासा.. ‘न्यू-ड सीन्स देण्यास नकार दिला म्हणून संपलं माझं करिअर’…

रणबीर कपूरच्या अभिनेत्रीचा खुलासा.. ‘न्यू-ड सीन्स देण्यास नकार दिला म्हणून संपलं माझं करिअर’…

बॉलीवूड मधील अनेक कलाकार हे कायम कोणत्या ना कोणत्या कारणांवरून चर्चेत असतात. प्रत्येक कलाकार हे त्यांना काम मिळण्यासाठी व यश मिळण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत असतात व प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात.

मात्र यापैकीच बॉलीवूड मधील कलाकारांनी आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. अशातच बॉलीवूडमध्ये करिअर करायचे असेल तर काय काय करावे लागते याचा धक्कादायक खुलासा नर्गिस फाखरी हिने केला आहे.

अभिनेता रणबीर कपूर याच्यासोबत ‘रॉकस्टार’ चित्रपटात नर्गिस फाखरी हीने काम केलं व या चित्रपटानंतर नर्गिस प्रचंड लोकप्रिय अभिनेत्री बनली. त्यानंतर तीचं प्रचंड कौतुक करण्यात आलं व तिची बॉलीवूडमध्ये ओळख बनली. मात्र काही काळानंतर नर्गिस बॉलिवूडमध्ये पुढे न जाता मागेच राहिली आहे.

अभिनेत्री आणि माॅडेल नरगिस फाखरी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असलेली पाहायला मिळते. ती सोशल मीडियाच्या माध्यामातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. नरगिस तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असलेली पाहायला मिळते. अशातच नरगिस एका वेगळ्या कारणामुळे चर्चेचा विषय ठरत आहे.

नरगिस फाखरीनं एका मुलाखतीत तिच्या करिअर विषयी सांगितलं. नरगिसनं म्हटलं की, मला प्रसिद्धीची अजिबात लालसा नाहिये. ‘मी न्यू-ड पोझ देऊ की दिग्दर्शकासोबत रात्र घालवू’ मी अशा अनेक संधी माझ्या हातातून सोडल्या आहेत, कारण मला अशा कोणत्याच गोष्टी करायच्या नव्हत्या. मी येथे टिकून राहण्यासाठी प्रयत्न नाही केला, कारण माझ्या काही मर्यादा होत्या.

पुढे नरगिसनं म्हटलं की, माझ्या काम करताना काही मर्यादा आहेत. त्यामुळे मला या गोष्टीचं वाईट वाटतं की, या अशा गोष्टींमुळे माझं करिअर संपलं. मी आत्ता बाॅलिवडूमध्ये जिथे कोठे आहे त्याठिकाणी मी आनंदी आहे. कारण मी माझ्या तत्वांवर चालते आणि इं-टिमेट सीन देत नाही. अशा प्रकारच्या अनेक ऑफर्स आल्याच्या नरगिसनं यावेळी सांगतिलं मात्र मी या सगळ्यांना नकार दिला.

दरम्यान, नरगिस फाखरीनं राॅकस्टार या बाॅलिवूड चित्रपटातून पदार्पण केलं होतं. अभिनेता रणबीर कपूर आणि नरगिस यामध्ये सोबत झळकले होत. या चित्रपटानं नरगिसला भरपूर लोकप्रियता मिळवून दिली. सध्या नरगिस आपल्या बाॅयफ्रेंडसोबत क्वालिटी टाईम स्टेंड करत आहे.

admin