तारक मेहता मालिकेत येणार नवीन नट्टू काका?, फोटो होत आहे वायरल….

तारक मेहता मालिकेत येणार नवीन नट्टू काका?, फोटो होत आहे वायरल….

तारक मेहता का उल्टा चष्मा’ मध्ये नट्टू काकांची भूमिका साकारणारे अभिनेते घनश्याम नायक यांचे ३ ऑक्टोबर रोजी निधन झाले. घनश्याम नायक ‘तारक मेहता’ मालिका सुरू झाल्यापासूनच संपूर्ण टीमशी जोडले गेले होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ते आवडायचे.

‘नट्टू काका’ च्या भूमिकेत घनश्याम यांच्याशिवाय दुसऱ्या कोणालाही पाहणं तसं अवघड आहे. दरम्यान, सोशल मीडियावर तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेसाठी आता निर्मात्यांना नवीन नट्टू काका मिळाल्याची बातमी व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की ‘तारक मेहता’साठी नवीन नट्टू काका सापडले असून तो त्यांचाच फोटो आहे. मात्र, निर्मात्यांनी या वृत्तावर कोणताही दुजोरा दिलेला नाही. नवीन नट्टू काकांचा हा फोटो मालिकेशी संबंधित एका इन्स्टाग्राम फॅन क्लबवर शेअर केला आहे.

नट्टू काका म्हणजेच घनश्याम नायक हे गेल्या काही महिन्यांपासून कर्करोगाशी झुंज देत होते, त्यांच्यावर उपचारही सुरू होते. गेल्या वर्षी शस्त्रक्रियेदरम्यान त्याच्या घशातून आठ गाठी काढण्यात आल्या होत्या. गंभीर आजारी असतानाही नट्टू काका काम करत राहिले.

घनश्याम नायक १३ वर्षे ‘तारक मेहता’ चा भाग होते. त्यांचे मालिकेतले संवादही खूप प्रसिद्ध होते. त्यांना अभिनयाची इतकी आवड होती की शेवटच्या श्वासापर्यंत त्यांना काम करायचे होते. मेकअप करूनच मरावे, अशी त्यांची शेवटची इच्छा होती.

घनश्याम नायक यांनी ३५० हून अधिक टीव्ही मालिकांमध्ये काम केले. एवढंच नाही तर त्यांनी सुमारे २५० हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते बॉलिवूडमधील अनेक सिनेमांमध्ये दिसले होते. याशिवाय त्यांनी १०० गुजराती नाटकांमध्येही काम केले होते.

admin