अबब एवढा महाग ! नेहा कक्करने मेहंदी कार्यक्रमात परिधान केला होता इतक्या हजारांचा लेहंगा

अबब एवढा महाग ! नेहा कक्करने मेहंदी कार्यक्रमात परिधान केला होता इतक्या हजारांचा लेहंगा

सेलिब्रिटींच्या ‘बिग फॅट वेडिंग’कडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं असतं. अभिनेत्री दीपिका पदुकोण, अनुष्का शर्मा, प्रियांका चोप्रा, नेहा धुपिया यांच्यानंतर प्रसिद्ध गायिका नेहा कक्करच्या लग्नाची जोरदार चर्चा झाली.

रोका, मेहंदी आणि हळदीच्या कार्यक्रमातही राजेशाही थाट पाहायला मिळाला. या प्रत्येक कार्यक्रमासाठी नेहाने परिधान केलेल्या पोशाखांची सोशल मीडियावर फार चर्चा झाली. मेहंदीच्या कार्यक्रमात नेहाने तब्बल ७५ हजार रुपयांचा लेहंगा परिधान केला होता.

नेहाचा ब्रायडल लूक प्रियांका चोप्रा आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नातील लूकसारखाच दिसून आला. प्रियांकानेही तिच्या लग्नात लाल रंगाचा लेहंगा तर अनुष्काने गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला होता. अशाच रंगाचा व त्याच प्रकारता लेहंगा नेहाने परिधान केला होता.

नेहाने रायझिंग स्टार फेम गायक रोहनप्रीत सिंगशी लग्नगाठ बांधली. २४ ऑक्टोबर रोजी दिल्लीत आनंद कारज पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला. नेहाच्या लग्नाला उर्वशी ढोलकिया, उर्वशी रौतेला, मनिष पॉल यांसारखे सेलिब्रिटी उपस्थित होते.

admin